शेतकरी अनुदानापासून वंचित
By Admin | Updated: May 13, 2014 01:10 IST2014-05-12T23:56:27+5:302014-05-13T01:10:55+5:30
सवना : नुकसानीचे सारखेच क्षेत्र असून यादीतून नाव वगळल्यामुळे काही उत्पादकांना भरपाई मिळाली नाही.

शेतकरी अनुदानापासून वंचित
सवना : नुकसानीचे सारखेच क्षेत्र असून यादीतून नाव वगळल्यामुळे काही उत्पादकांना भरपाई मिळाली नाही. परिणामी या उत्पादकांनी नुकसान भरपाईची मागणी सेनगाव येथील तहसीलदरांना दिलेल्या निवेदनात केली आहे. सेनगाव तालुक्यातील सवना येथे अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले होते. हिवाळ्यातदेखील नदीला पूर आल्याने जनावरेदेखील वाहून गेले. या नुकसानीचे सर्वेक्षण प्रत्यक्ष ठिकाणावर न जाता केले गेल्याचा आरोप निवेदनात केला आहे. त्यामुळे सवना येथे सरसकट उत्पादकांचे नुकसान होवूनही काही शेतकर्यांना अनुदानापासून वंचित रहावे लागत आहे. नुकतीच यादी लावण्यात आल्याने सवना येथील काही उत्पादकांची नावे नाहीत. या उत्पादकांचे नुकसान होवूनही त्यांना भरपाईपासून लांब रहावे लागत आहे. लाभापासून वंचित राहत असल्याने उत्पादकांनी सेनगाव तहसीलदारांकडे धाव घेतली आहे. सवना येथील नुकसानीच्या सर्वेक्षणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच यातील दोषी अधिकार्यांवर कार्यवाही करण्याची मागणी दिलेल्या निवेदनात केली आहे. (प्रतिनिधी)