बांधावर रंगल्या ‘किसान गोष्टी’
By Admin | Updated: August 7, 2014 01:41 IST2014-08-07T01:29:23+5:302014-08-07T01:41:36+5:30
शिरूर अनंतपाळ : नावविण्यपूर्ण पिकांची लागवड करून जास्तीत जास्त उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडावे यासाठी येथील तालुका कृषी कार्यालयाने आत्मा

बांधावर रंगल्या ‘किसान गोष्टी’
शिरूर अनंतपाळ : नावविण्यपूर्ण पिकांची लागवड करून जास्तीत जास्त उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडावे यासाठी येथील तालुका कृषी कार्यालयाने आत्मा योजनेअंतर्गत ‘किसान गोष्टी’ हा उपक्रम सुरु केला आहे़ तालुक्यातील फक्रानपुरा येथे रविवारी थेट बांधावरच कांदा आणि सोयाबीन पिकांबाबत किसान गोष्टी उपक्रम आत्माचे प्रकल्प संचालक बाविस्कर यांच्या उपस्थितीत रंगला़
पारंपारिक पिकांऐवजी शेतकऱ्यांनी नाविण्यपूर्ण पिकांची लागवड करावी, यासाठी येथील तालुका कृषी कार्यालयाचे कृषी अधिकारी डी़बी़सुतार, अनंत गायकवाड, शिवप्रसाद वलांडे, श्रीधर वकिल, राजेंद्र मुळजे यांनी संपूर्ण तालुक्यात ‘किसान गोष्टी’ उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे़ रविवारी आत्मा योजनेचे प्रकल्प संचालक एस़एल़ बाविस्कर, उपसंचालक आऱटी़मोरे, बियाणे तज्ज्ञ किसन वीर, जयंत गावंडे, विठ्ठलराव पाटील यांच्या उपस्थितीत शंभर शेतकऱ्यांना तांत्रिक सल्ला व मार्गदर्शनाचा कार्यक्रम फक्रानपुरच्या थेट बांधावर रंगला़ फक्रानपुर परिसरातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली असून, त्यांना विक्रमी उत्पादन मिळावे़ यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला़ यावेळी प्रकल्प संचालक बाविस्कर यांनी लासल गावच्या धर्तीवर कांदा लागवड करून उत्पादनात भर टाकावी त्याचबरोबर सातत्याने पारंपारिक पिके न घेता आलटून पलटून पिके घेतली जावीत, असेही त्यांनी सांगितले़
यावेळी मोरे, वीर, सुतार पाटील यांचेही मार्गदर्शन झाले़ कार्यक्रमासाठी एस़एम़पाटील, पुजारी, माळी यांच्यासह वांजरखेडा, डोंगरगाव, हालकी आदी गावातील शंभर शेतकऱ्यांची उपस्थिती होती़ यावेळी शेती संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले़ (वार्ताहर)