शेतकरी आत्महत्या थांबेना!

By Admin | Updated: August 17, 2015 01:03 IST2015-08-17T00:46:50+5:302015-08-17T01:03:13+5:30

गंगाराम आढाव/जालना : जिल्ह्यात सलग मागील तीन वर्षांपासून दुष्काळाला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना सलग चौथ्यावर्षीही दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.

Farmer stops suicide! | शेतकरी आत्महत्या थांबेना!

शेतकरी आत्महत्या थांबेना!


गंगाराम आढाव/जालना : जिल्ह्यात सलग मागील तीन वर्षांपासून दुष्काळाला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना सलग चौथ्यावर्षीही दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. त्यातूनच आर्थिक अडचणीत सापडलेलाा शेतकरी आत्महत्येचा मार्ग अंवलबित आहेत. नापिकी आणि कर्जबाजारी पणाला कंटाळून जिल्ह्यातील ४० शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे.
जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे यावर्षी शेतकरी आत्महत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यात ४० शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला असून, त्यातील २६ आत्महत्याग्रस्त कुटुंबाना शासनाकडून मदत देण्यात आली.
शेतकऱ्यांना मदत देण्यास प्रशासनाकडून विलंब होत आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीच्या फायली तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयात धूळखात आहेत. त्याकडे कोणी लक्षही द्यायला तयार नसल्याची बाब समोर आली आहे.
जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांमध्ये श्रीमंता पुंडलिक गावडे ( रा. टाकळी ता. भोकरदन), पंडीत पांडूरंग गावडे (रा.भायडी ता. भोकरदन), रामप्रससाद उत्तमराव कांगणे (रा. रानमळा ता. मंठा), देवीदास किसन लोखंडे ( रा. लिंगेवाडी ता. भोकरदन), दत्ता श्रीरंग काकडे (वलखेड ता. परतूर), प्रल्हाद शिवसिंग जारवाल ( तडेगाव वाडी ता. भोकरदन), विशाल विठ्ठल नन्नवरे ( देव पिंपळगाव), एकनाथ संपत लकडे ( हडप ता. जालना), बबन रावसाहेब गायकवाड (अंबड), सुमनबाई मदनराव यादव ( लिंगसा ता. परतूर), प्रकाश अन्नासाहेब लहाणे (भायडी ता. अंबड), ज्ञानदेव नामदेव डोंगरे (नजीक पांगरी ता. बदनापूर), सुखदेव भीका जाधव (पेरजापूर ता. भोकरदन), विश्वनाथ रायभान बेरसाल (लोणी खु. ता. परतूर), संदीप सदाशिव नागरे (वाहेगाव श्रीष्टी ), रामभाऊ सावळीराम भुंबर (येणोरा ता. परतूर), राजेश दत्तराव सरोदे ( उस्वद ता. मंठा), शांताराम त्र्यंबक जाधव ( सावखेडा ता. भोकरदन), सुदाम दामोधर फदाट (बोरगाव बु. ता. जाफराबाद), देवीदास उद्धव काळे (बाबुलतारा ता. परतूर), सुदाम धिसिंराम भोकरे ( परतूर), कैलास विष्णू उगले( राजेवाडी ता. घनसावंगी), प्रभू भीमराव पाटोळे (राजंणीवाडी ता घनसावंगी), राजेंद्र विश्वनाथ आडसुड (गेवराईबाजार ता. बदनापूर), कारभारी गीरजा मैद (रा. झिरपी ता. अंबड), शेषराव हरी गवळी (वालसांवगी ता. भोकरदन), रामभाऊ लहानुजी कांबळे (उस्वद ता. मंठा) रामेश्वर उद्धवराव मोरे (रा. देवठाणा ता. मंठा) यांंचा समावेश आहे. दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाने तात्काळ उपाययोजना आखण्याची मागणी होत आहे.
जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या सुमारे १५ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना अद्यापपर्यंत शासकीय मदत मिळालेली नाही. त्यांच्या आर्थिक मदतीच्या फायली तहसीलव जिल्हाधिकारी कार्यालयात पडून आहे. जालना तहसील कार्यालयात तीन शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव असलेल्या फायली धूळखात आहे. त्यात भगवान गुमाजी शेळके (रा बोरखेडी) यांनी १९ जून रोजी आत्महत्या केलेली आहे. तसेच तुळशीराम प्रभू राठोड (रा वडीवाडी) यांनी २५ जुलै रोजी आत्महत्या केली. राधा भगवान जाधव (माळशेंद्रा) या शेतकरी महिलेने २० एप्रिल रोजी आत्महत्या केलेली आहे. या तीन प्रस्तावांचा समावेश आहे. तर भोकरदन तालुक्यातील बाबूराव सटवाजी तरमाळे (रा पिंपळगाव थोटे), केशव विश्वनाथ शिंदे (रा. कोसगाव), कृष्णा श्यामराव बोराडे (अवघडराव सावंगी), प्रकाश आनंदा गोरे (रा. हिसोडा) या चार शेतकऱ्यांचे, घनसावंगी तालुक्यातील रमेश गणेश शिंदे (देवी दहेगाव), अण्णाभाऊ विश्वनाथ अस्वले (रा. करडवाडी), दिंगबर राजेभाऊ आधुंडे (रा. सिंधखेड), भास्कर आसाराम ढवळे (रा. अंतरवाली राठी) तसेच जाफराबाद तालुक्यातील दोन शेतकऱ्यांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांच्या कुंटुबियांना अद्याप शासकीय मदत देण्यात आलेली नाही.

Web Title: Farmer stops suicide!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.