शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

शेतातील माल थेट ग्राहकांपर्यंत; छत्रपती संभाजीनगरात नवीन ७ ठिकाणी आठवडी बाजार भरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 19:42 IST

शेतकऱ्यांना आपल्या मालाला चांगला भाव मिळावा म्हणून शासनाने ‘संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी बाजार’ अभियान राबविण्यास मान्यता दिली.

छत्रपती संभाजीनगर : शहरातील नागरिकांना थेट शेतकऱ्यांचा माल मिळावा म्हणून महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला. राज्यातील प्रसिद्ध श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनीला आठवडी बाजार भरविण्याची परवानगी दिली आहे.

शेतकऱ्यांना आपल्या मालाला चांगला भाव मिळावा म्हणून शासनाने ‘संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी बाजार’ अभियान राबविण्यास मान्यता दिली. मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी चांगल्या प्रकारे बाजार भरवीत आहे. त्यांचा हा अनुभव डोळ्यासमोर ठेवून महापालिका प्रशासनानेही शहरात सात ठिकाणी बाजार भरविण्यास मंजुरी दिली. शहराच्या आसपास पालेभाज्यांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी थेट विक्री करता येईल. नागरिकांनाही ताज्या पालेभाज्या, फळे घेता येतील.

या ठिकाणी भरेल बाजारउल्कानगरी येथील मैदान, कारगिल मैदान-गारखेडा, मित्रनगर येथील जागा, समर्थनगर व्यायामशाळेसमोर, छत्रपती महाविद्यालयासमोरील खुली जागा, नक्षत्रवाडी पेट्रोल पंपाशेजारी मंदिराच्या पाठीमागील जागा, जवाहर कॉलनी-त्रिमूर्ती चौकमागील भाजी मंडईत बाजार भरविण्यात येईल. श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनीला दरमहा एक हजार रुपये (इतर कर वगळून) भाडे आकारणी करण्यात आल्याची माहिती मनपा प्रशासक जी. श्रीकांत, उपायुक्त अपर्णा थेटे यांनी दिली.

‘लोकमत’चा पाठपुरावाशहरात एकही चांगले भाजी मार्केट नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. सर्वसामान्य नागरिकांना भाजीपाला खरेदीसाठी होत असलेला त्रास समोर आणला होता. त्याची दखल घेऊन मनपा प्रशासनाने शहरात सात ठिकाणी आठवडी बाजार भरविण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMarketबाजारFarmerशेतकरी