शनया घेणार प्रेक्षकांचा निरोप ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:06 IST2020-12-22T04:06:11+5:302020-12-22T04:06:11+5:30

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या फॅन्ससाठी एक धक्कादायक बातमी आहे. या मालिकेच्या कथानकाला आता ट्विस्ट मिळणार असून शनाया हे ...

Farewell to the audience? | शनया घेणार प्रेक्षकांचा निरोप ?

शनया घेणार प्रेक्षकांचा निरोप ?

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या फॅन्ससाठी एक धक्कादायक बातमी आहे. या मालिकेच्या कथानकाला आता ट्विस्ट मिळणार असून शनाया हे पात्र लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. सध्या मालिकेत शनाया आरजे बनली आहे. ती बिंदू राणी बनून लोकांना रिलेशनशिपविषयी टिप्स देत आहे आणि यातच तिचा एक्स बॉयफ्रेंड पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात आला आहे. आता पुढील काही भागांमध्ये शनाया आणि तिच्या या पूर्वप्रियकराचे लग्न दाखवण्यात येणार आहे आणि शनाया त्याच्यासोबत परदेशात स्थायिक होणार असल्याचे मालिकेत दाखण्यात येणार असल्याची चर्चा रंगली आहे. या कथानकानुसार शनायाचे पात्र या मालिकेतून एक्झिट घेणार असल्याचे म्हटले जात आहे.

विकी कौशल म्हणतोय ही माझी शेजारीण

विकी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून विकी त्याच्या चाहत्यांशी संवाद देखील साधत असतो. नुकताच विकीने एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत विकीने त्याच्या शेजाऱ्यांची ओळख करून दिली आहे. विकीचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. विकीने त्याचा हा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. विकीसोबत या फोटोमध्ये एक पाळीव कुत्री दिसत आहे. या कुत्रीचे नाव बेला आहे. बेला ही विकीच्या शेजाऱ्यांची पाळीव कुत्री आहे. विकीने हा फोटो शेअर करत “शेजारी… #बेला” असे कॅप्शन दिले आहे. विकी आणि बेलामधील प्रेम पाहून त्याचे चाहते आनंदी झाले आहेत.

Web Title: Farewell to the audience?