शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

फर्दापूरचे दोन कोटींचे रेस्ट हाऊस ‘स्टार’ प्रवर्गात

By admin | Updated: August 18, 2014 00:37 IST

मुजीब देवणीकर, औरंगाबाद पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने जोरदार प्रयत्न सुरू केले असून, फर्दापूर येथील रेस्ट हाऊसला चक्क ‘स्टार’प्रवर्गाचे करण्यात आले आहे.

मुजीब देवणीकर, औरंगाबादपर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने जोरदार प्रयत्न सुरू केले असून, फर्दापूर येथील रेस्ट हाऊसला चक्क ‘स्टार’प्रवर्गाचे करण्यात आले आहे. या कामावर शासनातर्फे तब्बल दोन कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, लवकरच रेस्ट हाऊस पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे.जगप्रसिद्ध अजिंठा लेण्या पाहण्यासाठी लाखो पर्यटक येत असतात. यामध्ये विदेशी आणि देशी पर्यटक असतात. पर्यटकांना मुक्काम करण्यासाठी मूलभूत सोयी-सुविधा नव्हत्या. काही व्हीआयपी पर्यटकांसाठी स्टार दर्जाचे रेस्ट हाऊस नव्हते. फर्दापूर येथील एमटीडीसीच्या रेस्ट हाऊसमध्ये देशी पर्यटकही थांबत नसत. यामुळे एमटीडीसी प्रशासनाने मागील वर्षी शासनाकडे रेस्ट हाऊसच्या डागडुजीबाबत एक प्रस्ताव पाठविला. शासनाने हा प्रस्ताव मान्य करून तब्बल दोन कोटी रुपयांचा विशेष निधीही मंजूर केला. या निधीतून एमटीडीसी प्रशासनाने कंत्राटदारांमार्फत रेस्ट हाऊचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक पांडुरंग कुलकर्णी यांनी सांगितले की, देशभरात अनेक ठिकाणी एमटीडीसीचे स्टार दर्जाचे रेस्ट हाऊस आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातही व्हीआयपी दर्जाचे विश्रामगृह व्हावे यासाठी प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. अखेर या कामात यश आले आहे.१ सप्टेंबरपर्यंत फर्दापूरच्या स्टार रेस्ट हाऊसचे काम संपणार असून, त्यानंतर ते लोकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे कुलकर्णी यांनी नमूद केले. या विश्रामगृहात थांबणाऱ्या पर्यटकांना व्हीआयपी सेवा-सुविधा मिळतील. निसर्गरम्य परिसरात आपण थांबलोय याची जाणीवही त्यांना होईल. एमटीडीसीच्या अभियांत्रिकी विभागातर्फे संपूर्ण रेस्ट हाऊसचे काम झाले आहे.