फर्दापूरचे दोन कोटींचे रेस्ट हाऊस ‘स्टार’ प्रवर्गात

By Admin | Updated: August 18, 2014 00:37 IST2014-08-18T00:28:05+5:302014-08-18T00:37:21+5:30

मुजीब देवणीकर, औरंगाबाद पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने जोरदार प्रयत्न सुरू केले असून, फर्दापूर येथील रेस्ट हाऊसला चक्क ‘स्टार’प्रवर्गाचे करण्यात आले आहे.

Fardapur's two-crore rest house in the 'Star' category | फर्दापूरचे दोन कोटींचे रेस्ट हाऊस ‘स्टार’ प्रवर्गात

फर्दापूरचे दोन कोटींचे रेस्ट हाऊस ‘स्टार’ प्रवर्गात

मुजीब देवणीकर, औरंगाबाद
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने जोरदार प्रयत्न सुरू केले असून, फर्दापूर येथील रेस्ट हाऊसला चक्क ‘स्टार’प्रवर्गाचे करण्यात आले आहे. या कामावर शासनातर्फे तब्बल दोन कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, लवकरच रेस्ट हाऊस पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे.
जगप्रसिद्ध अजिंठा लेण्या पाहण्यासाठी लाखो पर्यटक येत असतात. यामध्ये विदेशी आणि देशी पर्यटक असतात. पर्यटकांना मुक्काम करण्यासाठी मूलभूत सोयी-सुविधा नव्हत्या. काही व्हीआयपी पर्यटकांसाठी स्टार दर्जाचे रेस्ट हाऊस नव्हते. फर्दापूर येथील एमटीडीसीच्या रेस्ट हाऊसमध्ये देशी पर्यटकही थांबत नसत. यामुळे एमटीडीसी प्रशासनाने मागील वर्षी शासनाकडे रेस्ट हाऊसच्या डागडुजीबाबत एक प्रस्ताव पाठविला. शासनाने हा प्रस्ताव मान्य करून तब्बल दोन कोटी रुपयांचा विशेष निधीही मंजूर केला.
या निधीतून एमटीडीसी प्रशासनाने कंत्राटदारांमार्फत रेस्ट हाऊचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक पांडुरंग कुलकर्णी यांनी सांगितले की, देशभरात अनेक ठिकाणी एमटीडीसीचे स्टार दर्जाचे रेस्ट हाऊस आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातही व्हीआयपी दर्जाचे विश्रामगृह व्हावे यासाठी प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. अखेर या कामात यश आले आहे.
१ सप्टेंबरपर्यंत फर्दापूरच्या स्टार रेस्ट हाऊसचे काम संपणार असून, त्यानंतर ते लोकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे कुलकर्णी यांनी नमूद केले. या विश्रामगृहात थांबणाऱ्या पर्यटकांना व्हीआयपी सेवा-सुविधा मिळतील. निसर्गरम्य परिसरात आपण थांबलोय याची जाणीवही त्यांना होईल. एमटीडीसीच्या अभियांत्रिकी विभागातर्फे संपूर्ण रेस्ट हाऊसचे काम झाले आहे.

Web Title: Fardapur's two-crore rest house in the 'Star' category

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.