तीन दिवसांत तापमानात ५ अंशांनी घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 22:41 IST2019-01-29T22:40:54+5:302019-01-29T22:41:32+5:30
औरंगाबाद : शहरात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढला असून, गेल्या काही दिवसांत तापमानात ५ अंशांनी घसरण झाली आहे. चिकलठाणा ...

तीन दिवसांत तापमानात ५ अंशांनी घसरण
औरंगाबाद : शहरात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढला असून, गेल्या काही दिवसांत तापमानात ५ अंशांनी घसरण झाली आहे. चिकलठाणा वेधशाळेत मंगळवारी कमाल तापमान २५.४ अंश, तर किमान तापमान ७.९ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले.
शहरात रविवारपासून चांगलीच थंडी जाणवत आहे. चिकलठाणा वेधशाळेत रविवारी कमाल तापमान २६.२ अंश, तर किमान तापमान १३.० अंश इतके नोंदविले गेले होते. अवघ्या तीन दिवसांत तापमानात मोठी घट झाली आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस रेक ॉर्ड ब्रेक थंडीचा अनुभव शहरवासीयांनी घेतला होता. त्यानंतर तब्बल २५ दिवसांनंतर शहरात पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढला आहे. कमाल आणि किमान तापमानात घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी आठवडाभर थंडीची लाट कायम राहणार आहे.