शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

गुगलवरील बनावट कस्टमर केअरने केला घात; सायबर गुन्हेगारांचा हवालदाराला पाच लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2020 6:35 PM

नागरिकांनी गुगल सर्च इंजिनवर मिळालेल्या कोणत्याही क्रमांकाची खात्री केल्यानंतरच माहिती द्यावी

ठळक मुद्देभामट्यांनी परस्पर उचलले कर्जसर्च इंजिनवरील बनावट माहितीचा फटका

औरंगाबाद : दोन दिवसांपूर्वी फौजदाराला ९० हजारांचा आॅनलाईन गंडा घातल्याची घटना ताजी असतानाच सायबर भामट्यांनी पोलीस हवालदाराच्या नावे बँकेकडून परस्पर वैयक्तिक कर्ज (पर्सनल लोन) मंजूर करून घेत ५ लाख १८ हजार रुपयांची आॅनलाईन फसवणूक केली. हा खळबळजनक प्रकार समोर येताच याप्रकरणी बेगमपुरा ठाण्यात तक्रार नोंदविली.

तक्रारदार राजेश तुळशीराम फिरंगे हे क्रांतीचौक ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांचे अ‍ॅक्सिस बँकेत खाते आहे. ८ आॅगस्ट रोजी रात्री एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये १० हजार रुपये काढण्यासाठी ते गेले. त्यावेळी अचानक वीज गुल झाल्याने एटीएममधून रक्कम बाहेर आली नाही. मात्र, त्यांच्या खात्यातून १० हजार रुपये वजा झाल्याचा मेसेज त्यांना प्राप्त झाला. यामुळे दुसऱ्या दिवशी ते अ‍ॅक्सिस बँकेत गेले आणि त्यांनी याविषयी तक्रार दिली. मात्र, आजपर्यंत बँकेने त्यांच्या खात्यात पैसे जमा केले नाही.

यामुळे २९ आॅगस्ट रोजी त्यांनी गुगलवर अ‍ॅक्सिस बँकेच्या कस्टमर केअरचा नंबर मिळवून संपर्क साधला त्यावेळी तेथील व्यक्तीने त्यांच्याकडून एटीएमकार्डवरील क्रमांक घेतला आणि पैसे परत पाठविण्याची प्रोसेस सुरू असल्याचे उत्तर देऊन फोन कट केला. नंतर काही वेळाने त्यांच्या मोबाईलवर कॉल आला आणि मोबाईलवर एक लिंक पाठविली आहे ती लिंक उघडून त्यातील फॉर्म भरून सबमिट करा, असे सांगितले. यामुळे फिरंगे यांनी लगेच मोबाईलवर आलेल्या लिंकवर माहिती आणि फॉर्म भरून आॅनलाईन पाठवला.

अ‍ॅक्सिस बँकेकडून तुम्हाला काही मेसेज येतील ते परत मोबाईलवर पाठवा, असे त्यांना सांगण्यात आल्याने त्यांनी त्यांच्या मोबाईलवर प्राप्त सर्व मेसेज त्यांना कॉल करणाऱ्या मोबाईल क्रमांकावर फॉरवर्ड केले. यानंतर एक मेसेज त्यांना अ‍ॅक्सिस बँकेने ४ लाख ९० हजार रुपये पर्सनल लोन मंजूर केल्याचा होता. यानंतर त्यांच्या खात्यात कर्ज रक्कम बँकेने जमा केली आणि अवघ्या काही मिनिटात २ लाख १७ हजार ७० पैसे, १ लाख ५ रुपये, २ लाख १७ हजार ७० पैसे आणि १७ हजार ९०५ रुपये ९० पैसे पेटीएमद्वारे काढून घेण्यात आल्याचे मेसेज प्राप्त झाले.  

गुगलवर अनेक बनावट कस्टमर केअर नंबरसायबर गुन्हेगार हे विविध बँका आणि वित्तीय संस्था, एलपीजी एजन्सीचे बनावट कस्टमर केअर नंबर टाकतात. एवढेच नव्हे, तर बनावट वेबसाईट सुरू करतात. या नंबरवर संपर्क साधणाऱ्या व्यक्तीची अशा प्रकारे फसवणूक केली जाते. यामुळे नागरिकांनी गुगल सर्च इंजिनवर मिळालेल्या कोणत्याही क्रमांकाची खात्री केल्यानंतर त्यांना माहिती द्यावी, असे आवाहन बेगमपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन सानप यांनी केले आहे. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी