बनावट खाते उघडून अपहार; चौघांवर गुन्हा
By Admin | Updated: May 20, 2015 00:17 IST2015-05-20T00:02:08+5:302015-05-20T00:17:21+5:30
जालना/राणीउंचेगाव: तीन बनावट खाते उघडून एक लाखाचा अपहार केल्याप्रकरणी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चेअरमन व जिमस बँक शाखाधिकाऱ्यांसह चार जणांविरूद्ध

बनावट खाते उघडून अपहार; चौघांवर गुन्हा
जालना/राणीउंचेगाव: तीन बनावट खाते उघडून एक लाखाचा अपहार केल्याप्रकरणी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चेअरमन व जिमस बँक शाखाधिकाऱ्यांसह चार जणांविरूद्ध अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन श्रीरंग सखाराम शिंदे, ग्रामसेवक सूर्यवंशी, संगणक आॅपरेटर विलास चव्हाण, जि.म.स बँकेचे शाखाधिकारी कोरडे यांनी संगनमत करून १४ मार्च २०१४ ते मार्च २०१५ या कालावधीत बनावट दस्तावेज तयार करून तीन वेगवेगळे बनावट खाते उघडून त्याद्वारे शासनाचे आलेले अनुदान परस्पर उचलून १ लाख रूपयाचा अपहार केला. याप्रकरणी भरतप्रसाद मंत्री यांच्या फिर्यादीवरून मंगळवारी अंबड पोलीस ठाण्यात सोसायटी चेअरमन श्रीरंग शिंदे, ग्रामसेवक सूर्यवंशी, संगणक आॅपरेटर विलास चव्हाण, जिमस बँक शाखाधिकारी कोरडे विरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)