‘वाजवी किंमत व शुद्धता ग्राहकांचा हक्क’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:05 IST2020-12-25T04:05:06+5:302020-12-25T04:05:06+5:30
सिल्लोड : तहसीलदार विक्रम राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली सिल्लोड तहसील कार्यालयात ग्राहक दिन साजरा करण्यात आला. नायब तहसीलदार संजय सोनवणे ...

‘वाजवी किंमत व शुद्धता ग्राहकांचा हक्क’
सिल्लोड : तहसीलदार विक्रम राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली सिल्लोड तहसील कार्यालयात ग्राहक दिन साजरा करण्यात आला. नायब तहसीलदार संजय सोनवणे मार्गदर्शन करताना म्हणाले की, ग्राहकांना वाजवी किंमत व मालाची शुद्धता मिळणे हा त्याचा हक्क आहे.
पुढे बोलताना सोनवणे म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या विविध शासकीय योजना ग्राहकांसाठी आहेत. संविधानाने ज्या प्रमाणे नागरिकत्वाचे हक्क दिले आहेत. त्याचप्रमाणे ग्राहक म्हणून काही अधिकारही दिले आहेत. त्याचा उपयोग केला पाहिजे. केंद्र सरकारने जुलै-२०१९ मध्ये ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत ई-कॉमर्स नियम लागू केले आहेत. वास्तविक ऑनलाइन शॉपिंगच्या ट्रेंडमुळे हे बदल केले गेले आहेत. ऑनलाइन खरेदी प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात फसवणुकीच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे ग्राहकांनी जागृत राहिले पाहिजे. या कार्यक्रमाला सोहेल कादरी, अव्वल कारकून स्वाती म्हळसणे, आशिष औटी, ज्ञानेश्वर बनकर, पुरवठा विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
-------------------------------------
फोटो : सिल्लोड तहसील कार्यालय येथे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. तहसीलदार विक्रम राजपूत, नायब तहसीलदार संजय सोनवणे यांची उपस्थिती.