शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
4
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
5
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
6
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
7
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
8
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
9
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
10
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
11
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
12
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
13
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
15
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
16
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
17
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
18
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
19
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
20
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

डासोत्पत्ती रोखण्यात मनपाला अपयश !

By admin | Updated: November 7, 2014 00:42 IST

लातूर : पावसाळ्यात गप्पी मासे सोडले नाहीत की, कोरडा दिवस पाळला नाही. धूर फवारणी तर लांबच. मनपाच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे लातूर शहरात मोठ्या प्रमाणात डासोत्पत्ती ठिकाणे वाढली आहेत.

लातूर : पावसाळ्यात गप्पी मासे सोडले नाहीत की, कोरडा दिवस पाळला नाही. धूर फवारणी तर लांबच. मनपाच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे लातूर शहरात मोठ्या प्रमाणात डासोत्पत्ती ठिकाणे वाढली आहेत. परिणामी, डेंग्यूचा एडिस इजिप्ती डास सक्रिय झाला आहे. त्याच्या दंशामुळे जिल्ह्यातील ५५ जणांना डेंग्यूची लागण झाली असून, चौघांना या डासाने गिळंकृत केले आहे. तरीही मनपा झोपेतच आहे. ‘लोकमत’ने गेल्या तीन दिवसांपासून आणि यापूर्वीही वृत्त प्रकाशित केल्यानंतर काही प्रमाणात झोपलेली मनपा जागी झाली आणि कर्मचाऱ्यांनानोटिसा देण्यात आल्या. मात्र फॉगिंग करून डासोत्पत्ती ठिकाणे नष्ट करण्यात मनपाचे दुर्लक्षच आहे.लातूर शहरात चारशे ते सव्वाचारशे डासोत्पत्ती ठिकाणे आहेत. जिल्हाभरात सहाशे ते सातशे डासोत्पत्ती ठिकाणे आहेत. या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात डासोत्पत्ती होत आहे. या डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पावसाळ्यात हौदात गप्पी मासे सोडले जातात. तर घरोघरी कोरडा दिवस पाळून डासोत्पत्ती रोखण्याचा प्रयत्न केला जातो. जिल्हा हिवताप कार्यालयाच्या वतीने डासोत्पत्ती ठिकाणांचा शोध घेऊन संबंधित यंत्रणेला ती नष्ट करण्याबाबत सुचविले जाते. परंतु, गेल्या पावसाळ्यात ना हिवताप कार्यालयाने गप्पी मासे सोडले ना मनपाने डासोत्पत्ती ठिकाणे नष्ट करण्यासाठी मोहीम राबविली. परिणामी, गेल्या दोन महिन्यांपासून डासांचा उद्रेक वाढला आहे. जिल्हाभरात डेंग्यूसदृश रुग्ण सापडत आहेत. जिल्हा हिवताप कार्यालयाने जे अडीच हजार रक्तनमुने प्रयोगशाळेला पाठविले, वर्षभरात ५५ रुग्णांच्या रक्तनमुन्याचा डेंग्यू पॉझिटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे या डेंग्यूच्या तापीने चौघा जणांचा मृत्यू झाला. तरीही मनपा डासोत्पत्ती रोखण्याबाबत पुढे येऊ शकली नाही. हिवताप कार्यालयाने जिल्ह्यातील मनपा, नगरपालिका, ग्रामपंचायतींना डासोत्पत्तीचा उद्रेक कळूनही डासोत्पत्ती ठिकाणे नष्ट होऊ शकली नाहीत. (प्रतिनिधी)लातूर शहरातील प्रत्येक प्रभागांत सकाळी व संध्याकाळी धूर फवारणी करण्यात येत आहे. मनपाकडे धूर फवारणीचे १३ यंत्र आहेत. या यंत्राद्वारे प्रत्येक प्रभागात धूर फवारणी सुरू करण्यात आली आहे. सकाळी व संध्याकाळी एक-एक वॉर्ड धरून फवारणी केली जात आहे. त्यासोबतच अ‍ॅबेटिंगही केली जात आहे. पाण्यात औषधी मिसळून डासोत्पत्ती रोखण्याचा प्रयत्न मनपाने हाती घेतला आहे. डास वाढणार नाहीत, यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी आणि मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. महेश पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील ५५ जणांना डेंग्यू झाला, तर चौघा जणांचा मृत्यू झाला. खाजगी रुग्णालयांतील अनेक रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आहेत. परंतु, जिल्हा हिवताप कार्यालयाच्या प्रयोगशाळेतून आलेला अहवालाच ग्राह्य धरल्यामुळे खाजगी रुग्णालयातील रुग्ण संशयित डेंग्यू म्हणूनच ग्राह्य धरले जातात. एवढ्या मोठ्या प्रमाणात डेंग्यूचा उद्रेक सुरू असताना मनपा झोपेत आहे. ४‘लोकमत’मध्ये या डेंग्यूच्या उद्रेकाबाबत वृत्त प्रकाशित होताच लातूर मनपाने १५२ लोकांना नोटिसा पाठविल्या आहेत. एवढीच कारवाई मनपाने केली आहे. अद्याप धूर फवारणी केल्याचे दिसत नाही. तात्पुरते व कायमस्वरूपी डासोत्पत्ती ठिकाणांचा शोध घेऊन त्या नष्ट करण्याबाबत अद्याप उपाययोजना नसल्याने डासांचा उद्रेक सुरू आहे.