नांदेड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी २०१४-१५ या वर्षात केळी व मोसंबी या पिकांचा ५३०१ हेक्टरचा विमा काढला होता. त्यासाठी विमाहत्यापोटी ४ कोटी ७२ लाखांचा भरणा केला. जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थिती असताना विमा कंपनीने केवळ १ कोटी ६४ लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली देवून शेतकऱ्यांना गाजर दाखविले आहे. त्याविरुद्ध शेतकऱ्यांना पुनरभरपाई द्यावी, अशी मागणी पंतप्रधानाकडे मराठवाडा शेतकरी प्रतिनिधी प्रा. शिवाजी मोरे सोनखेडकर यांनी केली होती. त्याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून दखल घेण्यात आली असून योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश इन्शुरन्स रेग्युलिटी अॅन्ड डेव्हलपमेंट अॅथॉरीटीचे अर्थिक सल्लागार ललीतकुमार यांना दिल्याचे पत्र शेतकरी प्रतिनिधी मोरे यांना आले आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान आधारित विमा योजना फळपीक व खरीपासाठी अॅग्रीकल्चरल इन्शुरन्स कंपनी आॅफ इंडिया लि.व टाटा एजी या दोन कंपनीमार्फत राबविण्यात आली. जिल्ह्यात ५९ हार शेतकऱ्यांनी ४ कोटी ७५ लाख रुपये विमा हप्ता भरला होता. मात्र त्यांना केवळ ९ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देवून शेतकऱ्यांवर अन्याय केला. त्यामुळे यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश पंतप्रधान कार्यालयाने दिले आहेत. (प्रतिनिधी)
फळपीक विमा नुकसान भरपाईची दखल
By admin | Updated: December 17, 2015 00:20 IST