वाळूज एमआयडीसीत १२ स्टँडपोस्टवर टँकर भरण्याची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 23:24 IST2019-05-21T23:24:39+5:302019-05-21T23:24:51+5:30
टँकर भरण्यासाठी १२ स्टॅण्डपोस्ट उभारले आहेत. तीन-चार दिवसांत आनखी एक स्टँडपोस्ट सुरु करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

वाळूज एमआयडीसीत १२ स्टँडपोस्टवर टँकर भरण्याची सुविधा
वाळूज महानगर : दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई सुरु आहे. या पार्श्वभूमीवर वाळूज एमआयडीसीच्या जलशुद्धीकरण केंद्रातून टँकरद्वारे ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. टँकर भरण्यासाठी १२ स्टॅण्डपोस्ट उभारले आहेत. तीन-चार दिवसांत आनखी एक स्टँडपोस्ट सुरु करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. वाळूज एमआयडीसीच्या जलशुद्धी केंद्रावरुन जवळपास ७०० टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.
टँकर भरण्यासाठी एमआयडीसीने डब्ल्यूडीपी येथे ५, साजापूर येथे ४ व बीकेटी येथे २ असे एकूण ११ स्टँडपोस्ट सुरु केले आहेत. मात्र, टँकरची संख्या लक्षात घेवून डब्ल्यूडीपी येथे दोन-तीन दिवसांत आणखी १ स्टँडपोस्ट सुरु करण्यात येणार आहे.
येथून गंगापूर, कन्नड, वैजापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच शेंद्रा ५, पडेगाव २ तर चिकलठाणा येथे एका ठिकाणी पाणी भरण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.