ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेव देयकाचा भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:05 IST2021-04-22T04:05:51+5:302021-04-22T04:05:51+5:30

कोरोना कालावधीत दर महिन्याचे येणारे बिल भरणे ग्राहकांना खूप अवघड जाते. त्यातच लॉकडाऊन मुळे रोजीरोटी बंद झाली आहे. मात्र, ...

Extra security deposit payment to customers | ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेव देयकाचा भुर्दंड

ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेव देयकाचा भुर्दंड

कोरोना कालावधीत दर महिन्याचे येणारे बिल भरणे ग्राहकांना खूप अवघड जाते. त्यातच लॉकडाऊन मुळे रोजीरोटी बंद झाली आहे. मात्र, महावितरणच्या वतीने ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवचे देयक देऊन शॉक दिला जात आहे. सध्या विजेची बिले प्रत्येक महिन्याला येत आहे. ग्राहक त्या बिलांचे भरणाही करीत आहे. भरणा केला नाही तर वीज वितरण कंपनीकडून वीज खंडित करण्यात येते. एप्रिल महिन्याच्या वीज बिलामध्ये आणखी एक अतिरिक्त सुरक्षा ठेवीची बिले ग्राहकांना देण्यात येत आहे. वीज बिल भरणा करण्याची शेवटची तारीख २९ एप्रिल आहे. तर अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्याची तारीख ८ मे आहे. त्यामुळे ग्राहकांना डबल भुर्दंड सोसावा लागत आहे. अतिरिक्त सुरक्षा ठेवीची देयके रद्द करून ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

Web Title: Extra security deposit payment to customers