दोन रेल्वेला ‘दमरे’कडून मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:22 IST2021-02-05T04:22:36+5:302021-02-05T04:22:36+5:30
नांदेड ते बंगळुरू उत्सव विशेष रेल्वेला १ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. रामेश्वर-ओखा साप्ताहिक उत्सव विशेष एक्स्प्रेसला ५ फेब्रुवारी ...

दोन रेल्वेला ‘दमरे’कडून मुदतवाढ
नांदेड ते बंगळुरू उत्सव विशेष रेल्वेला १ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. रामेश्वर-ओखा साप्ताहिक उत्सव विशेष एक्स्प्रेसला ५ फेब्रुवारी ते २६ मार्चदरम्यान ८ फेऱ्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. तर ओखा - रामेश्वर साप्ताहिक उत्सव विशेष एक्स्प्रेसला ९ फेब्रुवारी ते ३० मार्चदरम्यान ८ फेऱ्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
मार्चपर्यंत धावणार ७५ किसान रेल्वे
औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड रेल्वे विभागातून पहिली किसान एक्स्प्रेस ५ जानेवारीला नगरसोल येथून सोडण्यात आली होती. त्यानंतर आतापर्यंत नगरसोल येथून २५ किसान विशेष रेल्वे चालविण्यात आल्या आहेत. ज्यात प्रामुख्याने कांदा पाठविण्यात आला आहे. या किसान रेल्वे न्यू गुवाहाटी, न्यू जलपाईगुडी , चितपूर, मालडा, अगरतला आदी ठिकाणी गेल्या. या २५ किसान रेल्वेमधून नांदेड रेल्वे विभागास ५.२५ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. नांदेड विभागातून मार्च महिन्याअखेरीस आणखी ७५ किसान विशेष रेल्वे सोडण्याचे उद्दिष्ट आहे.