विद्यापीठात पदव्युत्तरच्या प्रवेशासाठी २१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; रिक्त जागांवर थेट प्रवेश
By राम शिनगारे | Updated: August 11, 2023 18:57 IST2023-08-11T18:57:03+5:302023-08-11T18:57:47+5:30
५५ विभागातील रिक्त जागांवर 'फर्स्ट कम फर्स्ट अॅडमिशन बेसिस'वर हे प्रवेश देण्यात येणार आहेत.

विद्यापीठात पदव्युत्तरच्या प्रवेशासाठी २१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; रिक्त जागांवर थेट प्रवेश
छत्रपती संभाजीनगर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्व पदव्यूत्तर विभागात प्रवेशासाठी २१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णयकुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी घेतला आहे. ज्या विभागात जागा रिक्त असतील त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना थेट प्रवेश देण्यात येणार आहे.
विद्यापीठातील पदव्यूत्तर अभ्यासक्रमासाठी पहिल्या तीन टप्प्यात विज्ञान व तंत्रज्ञान, मानव्यविद्या, आंतरविद्या, वाणिज्य व्यवस्थापनशास्त्र या विद्याशाखेसह व्यायवसायीक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना समुपदेशन प्रवेश फेरीच्या माध्यमातून प्रवेश देण्यात आले. तिनही फेरी झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या सर्व जागांवर ऑनलाईन नोंदणी न केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना १८ ते ३१ जुलै या दरम्यान स्पॉट ॲडमिशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पॉट अॅडमिशनच्या माध्यमातून प्रवेश देण्यात आले. रिक्त जागांवर 'फर्स्ट कम फर्स्ट अॅडमिशन बेसिस'वर हे प्रवेश देण्यात येणार आहेत. पदव्यूत्तर विभागाच्या तासिका २६ जुलैपासून सुरु झाल्या आहेत. दरम्यान विद्यापीठातील विविध विभागातुन रिक्त असलेल्या जागांवर येत्या २१ ऑगस्टपर्यंत प्रवेश देण्यास मुदतवाढ दिली आहे.
पदवी अभ्यासक्रंमासाठीही मुदतवाढ
विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करीता प्रसिध्द केलेल्या शैक्षणिक दिनदर्शिकेमध्ये निर्धारीत केलेल्या सर्व पदवी व पदव्यूत्तर स्तरावरील अभ्यासक्रमाच्या प्रवेश घेण्याच्या प्रवेश प्रक्रियेची अंतीम तारीख अभ्यासक्रम पूर्ण करुन घेण्याच्या अटीवर २१ ऑगस्ट पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. महाविद्यालयांनी पात्रता आवदेन पत्र विहित शुल्कासह ३१ ऑगस्ट पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करण्यात यावे, यापुढे प्रवेशासंबंधी कुठलीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे शैक्षणिक विभागाचे उपकुलसचिव डॉ.संजय कवडे यांनी कळविले आहे.