शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

निर्यातदार बागा संकटात

By admin | Updated: August 18, 2015 23:50 IST

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई ज्या गावची डाळींब परदेशात निर्यात व्हायचे अशी कृषीक्रांती उंदरी (ता. केज) येथील शेतकऱ्यांनी घडवून आणली होती. मात्र निर्माण झालेल्या दुष्काळी

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाईज्या गावची डाळींब परदेशात निर्यात व्हायचे अशी कृषीक्रांती उंदरी (ता. केज) येथील शेतकऱ्यांनी घडवून आणली होती. मात्र निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीमुळे गावातील एक हजार एक्कर वरील डाळींब, अंबा व आद्रक मोडून काढण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. फळबागा जोपासण्यासाठी निर्माण झालेली दीडशे शेततळी ही पाण्याअभावी आटली आहेत. जिथे गावालाच टंँकरद्वारे पाणीपुरवठा होतो. तिथे फळबागा जोपासायच्या कशा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.उंदरी हे ४२०० लोकसंख्येचे गाव आठ वर्षांपूर्वी पारंपारिक शेतीला फाटा देत. नवीन तंत्रज्ञान अवगत करून शेतीत विविध प्रयोग साकारण्यासाठी युवक शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला. शासनाच्या राष्ट्रीय फलोद्यान योजनेच्या माध्यमातून गावात सातशे एक्कर डाळींब, शंभर एक्कर केशर अंबा,दोनशे एक्कर आद्रक व चिक्कू अशा एक हजार एक्करवर फळबागा उभ्या राहिल्या. सन २००९ पासून गावात कृषिक्रांती झाली. अन् गावातील दोनशे शेतकऱ्यांनी टप्प्या-टप्प्याने फळबाग लागवडीचा उपक्रम हाती घेतला. तीन वर्षात सातशे एक्कर मध्ये डाळींब, शंभर एक्कर मध्ये केशर अंबा, दोनशे एक्कर मध्ये आद्रकाची लागवड झाली.फळबाग योजनेच्या माध्यमातून गावात तीन वर्षात दीडशे शेततळी निर्माण झाली. विहिर,इंधन विहिर व शेततळ्याच्या पाण्यावर ठिबक सिंचनाद्वारे फळबागा जोपासल्या. विविध प्रकारच्या डाळींबाचे उत्पादन ही मोठ्या प्रमाणात निघाले. उंदरीच्या डाळींबाला परदेशात निर्यातीद्वारे मागणी वाढली.प्रतिकिलो ९० ते १०० रुपयांचा भावही मिळाला तर भारतात दिल्ली, बेंगलोर, झारखंड इथेही माल विक्रीसाठी जाऊ लागला. शेतकऱ्यांच्या कष्टाला यश आले. या माध्यमातून आर्थिक क्रांती झाली.डाळींबाच्या बागा जोपासतांना तेल्याबिमारी या महाभयंकर किडीवर मात करूनही या बागा उभ्या राहिल्या. मात्र गेल्या चार वर्षांपासून पडणाऱ्या अत्यल्प पावसामुळे गाव व परिसरातील सर्वच जलस्त्रोत निकामी झाले.शक्य होईल तोपर्यंत टँकरद्वारे पाणी देऊन मोठ्या कसरतीने बागा जोपासल्या. मात्र आता जलस्त्रोतच निकामी झाल्याने शेतकरीही हतबल झाले आहेत. पाण्याअभावी या फळबागा मोडून टाकण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.पुढील पंधरा ते वीसवर्षांचे होणार नुकसानफळबाग लागवडीसाठी मोठा खर्च येतो. हा खर्च करीत मोठ्या जिकीरीने फळबागांची लागवड झाली. एकदा लावलेल्या फळबागेचे उत्पादन किमान १५ ते २० वर्षे घेता येते. या फळबागांची लागवड ४ ते ५ वर्षापूर्वीच झालेली असल्याने व आता पाण्याअभावी फळबाग मोडण्याची वेळ आल्याने पुढील पंधरा ते वीस वर्षांचे नुकसान व मोठा आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे, अशी प्रतिक्रिया बाजार समितीचे संचालक तथा बागायतदार शेतकरी प्रदीप ठोंबरे यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केली. पाण्याअभावी शेतकऱ्यांच्या फळबागांचे मोठे नुकसान होत आहे. फळबागा जिवंत ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना काही मदत येईल का? याबाबत शासनाने गांभीर्याने विचार करून मदत करावी व शेतकऱ्यांचे होणारे मोठे नुकसान टाळावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नंदकिशोर मुंदडा यांनी केली आहे.उंदरी या गावाला गेल्या चार महिन्यांपासून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. एका टँकरद्वारे दररोज गावात चार खेपा करून गावची तहान भागवली जाते. गावालगत असलेला कारंजा लघु प्रकल्प ही पाण्याअभावी तीन वर्षांपासून कोरडा आहे. अशा स्थितीत जिथे पिण्याच्या पाण्याचीच भ्रांती तिथे फळबागा जोपासायच्या कशा? अशी प्रतिक्रिया पं. स. सदस्य तथा उंदरीचे बागायतदार सुदाम पाटील यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केली.