दरोड्याच्या तयारीतील टोळीचा पर्दाफाश

By Admin | Updated: March 25, 2017 23:01 IST2017-03-25T23:00:05+5:302017-03-25T23:01:34+5:30

बीड : दरोडा टाकण्याच्या उद्देशाने अंधारात दबा धरुन बसलेल्या सशस्त्र टोळीचा गुन्हे शाखेने शुक्रवारी पर्दाफाश केला

Explosive gang raid | दरोड्याच्या तयारीतील टोळीचा पर्दाफाश

दरोड्याच्या तयारीतील टोळीचा पर्दाफाश

बीड : दरोडा टाकण्याच्या उद्देशाने अंधारात दबा धरुन बसलेल्या सशस्त्र टोळीचा गुन्हे शाखेने शुक्रवारी पर्दाफाश केला. ही कारवाई बीड- पिंपळनेर रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाजवळ करण्यात आली.
समाधान बाबूराव खिंडकर, आकाश मोतीलाल कोटवाल, शंकर तानाजी गायकवाड, अक्षय उर्फ चिंटू मिटू गायकवाड, नाना सुदाम सुतार (सर्व रा. पुरग्रस्त कॉलनी, बीड) यांचा आरोपींत समावेश आहे. पहाटेच्या सुमारास हे सर्व जण शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयासमोर थांबले होते. फौजदार सचिन पुंडगे यांनी त्यांच्याकडे चौकशी केली तेव्हा उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्याकडे धारदार शस्त्रास्त्रे आढळून आली. अर्धवट क्रमांकाची दुचाकीही त्यांच्याकडून हस्तगत केली. पेठबीड ठाण्यात गुन्हा नोंद आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Explosive gang raid