शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

महागड्या टँकरची औरंगाबादकरांना झळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 11:59 PM

उन्हाळ्याला सुरुवात होताच शहरात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनत आहे. महापालिका समाधानकारक पाणी देऊ शकत नाही, त्यामुळे आजही शहरातील हजारो नागरिकांना दररोज खाजगी टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. खाजगी टँकरचालक फक्त वापरण्यायोग्य पाणी देतात. यासाठीही दरामध्ये प्रचंड वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे औरंगाबादकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

ठळक मुद्देनागरिक त्रस्त : मनपाकडून कोणत्याच उपाययोजना नाहीत

औरंगाबाद : उन्हाळ्याला सुरुवात होताच शहरात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनत आहे. महापालिका समाधानकारक पाणी देऊ शकत नाही, त्यामुळे आजही शहरातील हजारो नागरिकांना दररोज खाजगी टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. खाजगी टँकरचालक फक्त वापरण्यायोग्य पाणी देतात. यासाठीही दरामध्ये प्रचंड वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे औरंगाबादकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.शहराच्या आसपास किमान २५० वसाहतींना महापालिका पाणी देत नाही. यातील काही वसाहतींना टँकरद्वारे पाणीपुरवठा होतो. ज्या नागरिकांनी टँकरसाठी अ‍ॅडव्हान्स पैसे भरले आहेत, त्यांनाच टँकरद्वारे दोन दिवसाआड दोन ड्रम पाणी देण्यात येते. मनपाकडून फक्त पिण्यासाठी म्हणून पाणी देण्यात येते. वापरण्यासाठी आज हजारो नागरिकांना पाणी मिळत नाही. नाइलाजास्तव नागरिकांना खाजगी टँकर मागवावे लागते. मार्च महिन्याला सुरुवात होताच टँकर लॉबीनेही दरामध्ये भरमसाठ वाढ केली आहे. किलोमीटरनुसार याचे दर आहेत. जेथे टँकर भरण्यात येते तेथून अंतर मोजण्यात येते. जिथे पाणी नेऊन टाकायचे आहे, तेथील अंतर जास्त असल्यास दरही सर्वाधिक असतात. दोन हजार लिटरचे टँकर २ कि.मी. अंतरापर्यंत कोणी मागविले तर ३५० रुपये दर आकारला जातो. ४ कि.मी. अंतर असल्यास ४०० रुपये. किलोमीटर जसजसे वाढेल तसे शंभर रुपये वाढत जातात, असे एका टँकर विक्रेत्याने सांगितले. शहराच्या आसपास ज्या नवीन वसाहती तयार झाल्या आहेत, त्या भागातील विंधन विहिरींचे पाणी आता आटले आहे. अनेक विहिरींनी तळ गाठला आहे.मनपाचे ९४ टँकरमहापालिकेमार्फत सध्या ९४ टँकर सुरू आहेत. नागरिकांनी पैसे भरून टँकर मागविले तर दोन ते तीन तासांमध्ये पाणी देण्यात येते. पाच हजार लिटरचे टँकर ८९० रुपयांमध्ये, तर १० हजार लिटरसाठी १७८० रुपये द्यावे लागतात. गुंठेवारी भागातील असंख्य नागरिक पैसे भरून मनपाकडून पाणी घेतात. एका नागरिकाकडून दरमहा ३६६ रुपये भरून घेण्यात येतात. महिन्यातून १८ ते २० ड्रम पाणी मनपाकडून देण्यात येते. १८ ते २० नागरिकांनी ग्रुप तयार करून पाणी घ्यावे, अशी मनपाची अट आहे.खाजगी टँकरचे दर२ हजार लिटर३५० ते ४००.........................५ हजार लिटर१ हजार रुपये.......................१० हजार लिटर१२०० ते १५००

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater scarcityपाणी टंचाई