खोकडपुरा रस्त्यावर दगडांचा खच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 07:28 IST2020-11-12T07:28:53+5:302020-11-12T07:28:53+5:30

अंतर्गंत रस्त्यांवरील सिग्नल बंदच औरंगाबाद : शहरातील जालना रोड वगळता बहुतांश अंतर्गंत रस्त्यांवरील वाहतूक सिग्नल सध्या बंद आहे. ज्युबली ...

Expenditure of stones on Khokadpura road | खोकडपुरा रस्त्यावर दगडांचा खच

खोकडपुरा रस्त्यावर दगडांचा खच

अंतर्गंत रस्त्यांवरील

सिग्नल बंदच

औरंगाबाद : शहरातील जालना रोड वगळता बहुतांश अंतर्गंत रस्त्यांवरील वाहतूक सिग्नल सध्या बंद आहे. ज्युबली पार्क, मिल कार्नर, सिल्लेखान चौक, रेल्वेस्टेशन चौक, सावरकर चौक आदी ठिकाणचे सिग्नल बंदच आहे. त्यामुळे याठिकाणी वेळोवेळी वाहतूक कोंडीला वाहनचालकांना तोंड द्यावे लागत आहे.

बसस्थानकात पाण्याची

सुविधा करण्याची मागणी

औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकातील पिण्याच्या पाण्याच्या जागेची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे प्रवाशांना नाईलाजाने बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यातून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. किमान पाण्याची सुविधा चांगली करण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.

दिवाळीत वीजपुरवठा

सुरळीत ठेवा

औरंगाबाद : शहरातील विविध भागांत अचानक वीज जाण्याचा प्रकार होतो. किमान दिवाळीत वीज जाणार नाही, याची दक्षता महावितरणने घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वीज पुरवठा सुरळीत राहील, यादृष्टीने खबरदारी घेतली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Expenditure of stones on Khokadpura road