‘उद्योग संजीवनी’ला पुन्हा मुदतवाढ
By Admin | Updated: March 20, 2016 23:56 IST2016-03-20T23:56:00+5:302016-03-20T23:56:39+5:30
औरंगाबाद : उद्योग संजीवनी योजनेला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. येत्या ३० एप्रिलपर्यंत औद्योगिक क्षेत्रातील भूखंडधारक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

‘उद्योग संजीवनी’ला पुन्हा मुदतवाढ
औरंगाबाद : उद्योग संजीवनी योजनेला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. येत्या ३० एप्रिलपर्यंत औद्योगिक क्षेत्रातील भूखंडधारक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यातील ७७ भूखंडधारकांनी आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतला असून, ‘एमआयडीसी’ला तीन कोटी रुपयांचा महसूल मिळाला असल्याचे ‘एमआयडीसी’चे प्रादेशिक अधिकारी सोहम वायाळ यांनी सांगितले.
औद्योगिक क्षेत्रातील बांधकामाची मुदत संपलेल्या भूखंडधारकांसाठी ‘एमआयडीसी’ने उद्योग संजीवनी योजना जाहीर केली होती. जे औद्योगिक भूखंड पूर्णत: मोकळे आहेत किंवा ज्या भूखंडावर अर्धवट बांधकाम झाले आहे तसेच ज्या भूखंडांचा विकास कालावधी ३१ आॅगस्ट २०१३ पूर्वी संपला आहे, अशा सर्व अविकसित भूखंडांसाठी ही योजना जाहीर करण्यात आली होती. औरंगाबाद, बीड व जालना औद्योगिक वसाहतीतील ७७ भूखंडधारकांनी या योजनेचा लाभ घेतला असून, त्यातून ‘एमआयडीसी’ला तीन कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. या योजनेस आता ३१ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी क्षेत्र व्यवस्थापक ए.एम. गावीत (चिकलठाणा, शेंद्रा, वाळूज, पैठण व बीड), डी. आर. शिरोळे (जालना) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वायाळ यांनी केले आहे.
वाळूज औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती, अशा परिस्थितीत २१ कोटी रुपये खर्च करून मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले असून, मलनिस्सारण वाहिन्यांची कामेही पूर्ण करण्यात आल्याची माहिती वायाळ यांनी दिली.