जालना-नगरसोल डेमू रेल्वेचा शिर्डीपर्यंत विस्तार
By Admin | Updated: June 3, 2017 00:47 IST2017-06-03T00:44:43+5:302017-06-03T00:47:40+5:30
औरंगाबाद :जालना-नगरसोल डेमू रेल्वेच्या साईनगर शिर्डीपर्यंत विस्तारास हिरवा झेंडा दाखविला जाणार आहे.

जालना-नगरसोल डेमू रेल्वेचा शिर्डीपर्यंत विस्तार
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : परळी येथून नांदेड विभागातील विविध रेल्वे कामांचे उद्घाटन, राष्ट्रास लोकार्पण केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. ३ जून रोजी होणार आहे. तसेच जालना-नगरसोल डेमू रेल्वेच्या साईनगर शिर्डीपर्यंत विस्तारास हिरवा झेंडा दाखविला जाणार आहे.
जालना-नगरसोल डेमू रेल्वे जवळपास सहा तास नगरसोल किंवा तारूर रेल्वेस्टेशनवर उभी असते. या रेल्वेचा विस्तार मनमाडपर्यंत करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. एक्स्प्रेसने औरंगाबाद ते मनमाड आणि जालना ते मनमाड जाणाऱ्या प्रवाशांचा भार कमी होईल. डेमू मनमाडपर्यंत न्या, ही मागणी रेल्वे प्रवासी संघटनेने केली होती. या रेल्वेचा विस्तार केल्याने शिर्डीला जाणाऱ्या भाविकांना याचा लाभ होईल.