शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

जर्मन कंपन्यांचे विस्तारीकरण; पायाभूत सुविधांसाठी भारतात गुंतवणूक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 6:25 PM

भारतात तंत्रज्ञानाची प्रगती होत आहे, त्यामुळे जर्मनीतील गुंतवणूक वाढत आहे. यामुळेच आम्ही नागपूर येथे मेट्रोत गुंतवणूक करीत आहोत. तसेच नाशिक,पुणे आणि ओडिशा, तामिळनाडूत गुंतवणूक वाढविणार असल्याचे प्रतिपादन जर्मन कौन्सिलेटचे राजदूत डॉ. यूरगन मोरहार्ड यांनी केले.

औरंगाबाद : भारतात तंत्रज्ञानाची प्रगती होत आहे, त्यामुळे जर्मनीतील गुंतवणूक वाढत आहे. यामुळेच आम्ही नागपूर येथे मेट्रोत गुंतवणूक करीत आहोत. तसेच नाशिक,पुणे आणि ओडिशा, तामिळनाडूत गुंतवणूक वाढविणार असल्याचे प्रतिपादन जर्मन कौन्सिलेटचे राजदूत डॉ. यूरगन मोरहार्ड यांनी केले.

चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चर, नॅसकॉम आणि ई-सी मोबिलिटीतर्फे  आयोजित स्मार्ट मोबिलिटी कॉन्फरन्सचे उद्घाटन डॉ. मोरहार्ड यांच्या हस्ते मंगळवारी जालना रोडवरील एका हॉटेलमध्ये झाले. यावेळी ते बोलत होते, व्यासपीठावर सीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ, ई-सी मोबिलिटीचे संचालक प्रशांत देशपांडे, नॅसकॉमचे संचालक प्रसाद देवरे, जर्मन कंपनी ईसीएम सी-मोर आॅटोमोटिव्ह या कंपनीचे एमडी ग्रेगॉर मेटॅनर यांची उपस्थिती होती.

मोरहार्ड म्हणाले, औरंगाबादेत आज ईसी ग्लोबलसोबत सामंजस्य करार केले आहेत. भारतीय टेक्नॉलॉजी, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, सर्वच क्षेत्रात वापर होत असलेले स्मार्टनेस आता आॅटोमोटिव्ह क्षेत्रातही दिसून येत आहे. ग्रेगॉर मेटॅनर म्हणाले, जर्मन किती टेक्नॉलॉजीच्या बाबतीत पुढे असले तरी आता काळ बदलतोय, टॅलेंटला जगात मान्यता आहे. भारतातील टेक्नॉलॉजी, आॅटोमोटिव्ह क्षेत्र, मेकॅनिकल क्षेत्र आणि त्याला मिळालेली ई-मोबिलिटीची साथ यामुळे आम्ही भारताकडे आशेने पाहत आहोत. 

सीएमआयएचे अध्यक्ष कोकीळ म्हणाले,अनेक क्लस्टर्स येथे होत आहेत. ब्रुमपासून ते इलेक्ट्रॉनिक, आॅटो, गारमेंट अशी कितीतरी क्लस्टर येथे झाली आहेत. जर्मन कंपन्यांनी विस्तारीकरणाचा विचार करताना महाराष्ट्रातील औरंगाबादचाच यापुढे विचार करावा. या कॉन्फरन्सला १५० हून अधिक कंपन्या, कॉलेज व नामांकित संस्थांचे मान्यवर उपस्थित होते. 

जर्मन कपन्यांसोबत करारात वाढ ई-मोबिलिटी क्षेत्रात काम करत असलेल्या पुण्यातील कंपनीचे संचालक एम.आर.सराफ म्हणाले, भारत जर्मन कंपन्यांसोबत विविध करार करीत आहे. ई-मोबिलिटी म्हणजे ड्रायव्हरलेस कार नसून आॅटोमोबाईलमध्ये आयटी आणि टेक्नॉलॉजीच्या जोरावर सूक्ष्म, अतिसूक्ष्म आधुनिकता आणून देणे आहे. स्मार्ट मोबिलिटी  या विषयावरील बारकावे, त्यातील बदल, जगापुढील आव्हाने आणि एकंदरीत सूक्ष्म विषयांवर तांत्रिक चर्चासत्रात मान्यवरांनी मार्गदर्शन केले. 

टॅग्स :businessव्यवसायAurangabadऔरंगाबादMIDCएमआयडीसीInvestmentगुंतवणूकGovernmentसरकारState Governmentराज्य सरकार