कार्यकारी अभियंत्यास जिवे मारण्याची धमकी

By Admin | Updated: May 22, 2014 00:11 IST2014-05-21T23:59:49+5:302014-05-22T00:11:59+5:30

लातूर : सार्वजनिक बांंधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यास ‘तू आम्हाला कामे का देत नाहीस’ म्हणून हुज्जत घालून शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना बांधकाम भवन येथे बुधवारी घडली.

Executive Engineer threatens to kill | कार्यकारी अभियंत्यास जिवे मारण्याची धमकी

कार्यकारी अभियंत्यास जिवे मारण्याची धमकी

लातूर : सार्वजनिक बांंधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यास ‘तू आम्हाला कामे का देत नाहीस’ म्हणून हुज्जत घालून शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना बांधकाम भवन येथे बुधवारी घडली. याबाबत दोघांविरुद्ध लातूर ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सार्वजनिक बांंधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विवेक त्रिंबक बडे हे आपल्या कार्यालयातील दालनात बुधवारी सकाळी काम करीत असताना ११.३० वाजेच्या सुमारास प्रशांत पाटील व महेश देवणे यांनी ‘आम्हाला कामे का देत नाहीस’ म्हणून शिवीगाळ केली. हाताला धरुन हुज्जत घातली. शिवाय, खुर्चीकडे पाण्याची बाटली फेकून मारण्याचा प्रयत्न केला. शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकीही दिली. कार्यालयात उपस्थित कर्मचार्‍यांनी त्या दोघांना समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवीगाळ सुरूच ठेवली, असे कार्यकारी अभियंता विवेक त्रिंबक बडे यांनी लातूर ग्रामीण पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार प्रशांत पाटील व महेश देवणे यांच्याविरुद्ध लातूर ग्रामीण पोलिसांत कलम ३५३, ५०४, ५०६, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यावेळी लातूर ग्रामीण पोलिसांत सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारी उपस्थित होते. प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ. सोनकांबळे करीत आहेत. (प्रतिनिधी) कामावरून भांडण... कामे देण्याच्या कारणावरून औसा रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याच्या दालनात सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी उपस्थित कर्मचार्‍यांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. परंतु, भांडण वाढतच गेले आणि पोलिसांत याची नोंद झाली.

Web Title: Executive Engineer threatens to kill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.