करमाड : शेंद्रा एमआयडीसीजवळ कुंभेफळ पाटीवर अर्धवट जळालेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मंगळवारी सकाळी जालनारोडपासून अवघ्या 120 फुटावर ही घटना उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच करमाड पोलीस ठाण्याचे पोनी संतोष खेतमाळस सापोनी प्रशांत पाटील हे आपल्या कर्मचाऱ्यांनासह घटनास्थळी दाखल झाले. अगोदर गळा कापून खून करण्यात आला व पुरावा नष्ट करण्याच्या मानसिकतेतून प्रेत जाळून टाकण्यात आल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे.
असे आहे मृतदेहाचे वर्णन मृत तरुणाचे वय अंदाजे २० ते ३० वर्ष असेल. लाल रंगाचा फुल टीशर्ट आणि निळ्या रंगाची फुल जीन्स पॅन्ट आहे. तसेच त्याच्या गळ्यात चेन, डाव्या हातात लाल रंगाची घडी आढळून आली आहे. मृत तरुणाची केसांची ठेवण मोठी असून कमरेत निळ्या रंगाचा पट्टा आणि पायात लालसर रंगाची चप्पल आढळून आली. याबाबतची माहिती कळविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.