खळबळजनक ! एकाच झाडास गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला पती-पत्नीचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 12:45 IST2022-01-03T12:24:05+5:302022-01-03T12:45:46+5:30

घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे

Exciting! The bodies of the couple were found hanging from the same tree | खळबळजनक ! एकाच झाडास गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला पती-पत्नीचा मृतदेह

खळबळजनक ! एकाच झाडास गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला पती-पत्नीचा मृतदेह

सेनगाव ( हिंगोली ) : तालुक्यातील दाताडा बुद्रुक शिवारामधील एका शेतात लिंबाच्या झाडाला पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघकीस आली आहे. रामदास ( २५ ) आणि शीतल इंगळे (२० ) अशी मृतांची नावे असून ते वाघजाळी येथील रहिवासी होते. 

वाघजाळी येथे रामदास आपली पत्नी शीतल आणि आईसह शेतात राहत असे. दोघांनी आत्महत्या केली की हा घातपाताचा प्रकार आहे, हे सांगणे शक्य नसल्याचे घटनास्थळी पोहचलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. दोघांच्या मृत्यूची वार्ता गावात पसरताच ग्रामस्थांनी शेतात गर्दी केली होती. सध्यातरी या प्रकरणी पोलिसात कुठलीही नोंद झाली नाही. पोलीस घटनास्थळाची पाहणी करत असून पुढील तपास सुरु आहेत. पोलीस तपासाअंतीच घटनेमागील खरे कारण पुढे येणार आहे.

Web Title: Exciting! The bodies of the couple were found hanging from the same tree