क्रेडाई आयोजित रक्तदान शिबीर उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:02 IST2021-05-05T04:02:56+5:302021-05-05T04:02:56+5:30

या शिबिराचे आयोजन म्हणजे, समाजाप्रति आपले कर्तव्यच आहे, अशी भावना क्रेडाई औरंगाबाद शाखेचे अध्यक्ष आर्किटेक्ट नितीन बगडिया यांनी ...

In the excitement of the blood donation camp organized by CREDAI | क्रेडाई आयोजित रक्तदान शिबीर उत्साहात

क्रेडाई आयोजित रक्तदान शिबीर उत्साहात

या शिबिराचे आयोजन म्हणजे, समाजाप्रति आपले कर्तव्यच आहे, अशी भावना क्रेडाई औरंगाबाद शाखेचे अध्यक्ष आर्किटेक्ट नितीन बगडिया यांनी व्यक्त केली. क्रेडाई महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष राजेंद्रसिंग जबिंदा आणि क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रमोद खैरनार यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. क्रेडाईचे माजी अध्यक्ष सुनील पाटील, क्रेडाई महाराष्ट्रचे सहसचिव नरेंद्रसिंग जबिंदा, उपाध्यक्ष विकास चौधरी, भास्कर चौधरी, अनिल मुनोत, आशुतोष नावंदर, सुनील बेदमुथा, इंद्रजित थोरात, सहसचिव रोहित सूर्यवंशी, अजित बापट, पंजाबराव तौर, संचालक अनिल संचेती, सहखजिनदार बालाजी येरावार, सौरभ गुप्ता, समीर सोनवणे, सिद्धार्थ कांकरिया आदींची यावेळी उपस्थिती होती.

भास्कर चौधरी, अनिल मुनोत आणि सौरभ गुप्ता यांनी शिबिराचे आयोजन केले होते. दत्ताजी भाले रक्तपेढीतर्फे रक्तसंकलन करण्यात आले. रक्तदान शिबिराचे आयोजन हे क्रेडाईचे कार्य कौतुकास्पद असल्याच्या भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.

बांधकाम व्यावसायिक, युथ विंगचे सदस्य, साईट अभियंता, निरीक्षक, सर्व प्रकारचे बांधकाम कामगार यांच्याकडून शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 'क्रेडाई' औरंगाबादच्या सर्व उपक्रमांची माहिती देणाऱ्या मासिक पत्रिकेचे विमोचन राजेंद्रसिंग जबिंदा आणि प्रमोद खैरनार यांच्या हस्ते झाले. क्रेडाईच्या सर्व उपक्रमांची माहिती, रिअल इस्टेट क्षेत्रातील घडामोडी, नवीन नियम, कायद्यातील बदल, बांधकाम क्षेत्राशी निगडित विविध माहिती या मासिक पत्रिकेत आहे.

फोटो ओळ

१. 'क्रेडाई' औरंगाबादच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराच्या उदघाटनप्रसंगी क्रेडाई महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष राजेंद्रसिंग जबिंदा, क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खैरनार, औरंगाबाद शाखाध्यक्ष नितीन बगडिया, माजी अध्यक्ष सुनील पाटील, क्रेडाई महाराष्ट्रचे सहसचिव नरेंद्रसिंग जबिंदा, उपाध्यक्ष विकास चौधरी, भास्कर चौधरी, अनिल मुनोत, सहसचिव पंजाबराव तौर, सहखजिनदार बालाजी येरावार, संचालक अनिलकुमार संचेती, युथ विंग समन्वयक सौरभ गुप्ता.

Web Title: In the excitement of the blood donation camp organized by CREDAI