वित्त विभागात बदल्यांचा बाजार

By Admin | Updated: May 12, 2014 00:09 IST2014-05-11T23:18:12+5:302014-05-12T00:09:19+5:30

बीड : जिल्हा परिषदेतील शिक्षण विभाग बेकायदेशीर बदल्यांमुळे सतत चर्चेत राहिला; पण आता वित्त विभागाने देखील शिक्षण विभागाचीच री ओढली आहे.

Exchange of commodities in the finance department | वित्त विभागात बदल्यांचा बाजार

वित्त विभागात बदल्यांचा बाजार

बीड : जिल्हा परिषदेतील शिक्षण विभाग बेकायदेशीर बदल्यांमुळे सतत चर्चेत राहिला; पण आता वित्त विभागाने देखील शिक्षण विभागाचीच री ओढली आहे. या विभागात एक- दोन नाही तर तब्बल पाच बदल्या नियम डावलून झाल्याची माहिती पुढे आली आहे. गतवर्षी बेकायदेशीर बदल्यांमुळे जिल्हा परिषद प्रशासनाच्या मागे चौकशीचार ससेमिरा लागला होता. १५ ते ३१ मे २०१३ या दरम्यान समूपदेशनानुसार बदल्यांची प्रक्रिया राबवावी, त्यानंतर एकही बदली करु नये असे शासनाचे स्पष्ट आदेश होते. मात्र, याउपरही जि.प. च्या वित्त विभागात पाच बदल्या नियमाला फाटा देत करण्यात आल्या. यामध्ये अंबाजोगाई पंचायत समितीतील सहायक लेखाधिकारी व्ही. एस. व्होटक र यांची बदली केज पंचायत समितीत १३ फेबु्रवारी २०१४ रोजी करण्यात आली. ७ फेबु्रवारी २०१४ रोजी कनिष्ठ लेखाधिकारी आय. डी. दोडके यांची पंचायत समिती गेवराई येथून जि.प. च्या आरोग्य विभागात बदली झाली. याच तारखेत आणखी दोन बदल्यांचे आदेश निघाले. यात सहायक लेखाधिकारी बी. डी.पवार यांची एमआरइजीएस, बीड येथून पंचायत समिती, अंबाजोगाई येथे बदली करण्यात आली. कनिष्ठ लेखाधिकारी जी. डी. पवार यांची पंचायत समिती, अंबाजोगाई येथून गेवराई पंचायत समितीत बदली झाली. याबाबत सीईओ राजीव जवळेकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. वित्त विभागासाठी वेगळा नियम आहे का? दरम्यान, शिरुर पंचायत समितीत २८ शिक्षकांच्या बदल्या नियमबाह्यपणे केल्या होत्या. या सर्व बदल्या रद्द करण्यात आल्या. मात्र, लेखा व वित्त विभागात झालेल्या पाच बेकायदेशीर बदल्यांची चौकशी तर दूरच; पण दाद ना फिर्याद आहे. त्यामुळे वित्त विभागासाठी वेगळे नियम आहेत का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी) बदल्यांची प्रक्रिया चित्रीकरणात व्हावी वर्ष सरले तरीही बेकायदेशीर बदल्यांना ‘बे्रक’ बसला नाही. सर्व बेकायदेशीर बदल्या तातडीने रद्द झाल्या पाहिजेत, अशी मागणी जि.प. सदस्य विजयसिंह पंडित यांनी केली. १७ मे पासून होणार्‍या बदल्यांची प्रक्रिया चित्रीकरणात झाली पाहिजे. विभागीय आयुक्त किंवा जिल्हाधिकार्‍यांचा प्रतिनिधी तेथे उपस्थित असावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. बदल्यांमध्ये अधिकार्‍यांचाच हस्तक्षेप जास्त असतो तो देखील थांबला पाहिजे असेही पंडित म्हणाले.

Web Title: Exchange of commodities in the finance department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.