मराठवाड्यातील पिकांना पावसाचा पुन्हा फटका; सात मंडळांत अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 01:46 PM2020-10-13T13:46:18+5:302020-10-13T13:52:31+5:30

Excessive rainfall in seven circles in Marathwada परतीच्या पावसाची सर्वदूर हजेरी

Excessive rainfall in seven circles in Marathwada; Crop again in 15 days | मराठवाड्यातील पिकांना पावसाचा पुन्हा फटका; सात मंडळांत अतिवृष्टी

मराठवाड्यातील पिकांना पावसाचा पुन्हा फटका; सात मंडळांत अतिवृष्टी

googlenewsNext
ठळक मुद्देवीज पडून एक ठारजलसाठे तुडुंब

औरंगाबाद/नांदेड/परभणी/ उस्मानाबाद/लातूर/बीड : मराठवाड्यात गेल्या चोवीस तासांत परभणी व नांदेड जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टी झाली. अन्यत्र पावसाचा जोर कमी असला तरी पिकांचे नुकसान सुरूच आहे. गेल्या १५ दिवसांत दुसऱ्यांदा काही भागांत अतिवृष्टी झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. नांदेड जिल्ह्यात एक तरुण पैनगंगेत वाहून गेल्याने मरण पावला. नांदेड जिल्ह्यातील एक व परभणी जिल्ह्यातील ६ मंडळांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. परभणी जिल्ह्यातील नागर जवळा (ता. मानवत) येथे सोमवारी दुपारी ३ वाजता शेतात वीज पडून गोरक्ष बालाजी रासवे (१७) हा तरुण ठार झाला. 

परभणी जिल्ह्यातील सहा मंडळांमध्ये रविवारी रात्री अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले. पाथरी तालुक्यातील बाबळगाव मंडळात ७७ मि.मी. कासापुरी मंडळात ७४ मि.मी., जिंतूर तालुक्यातील बोरी मंडळात ७४ मि.मी., चारठाणा मंडळात ७५ मि.मी. आणि वाघी धानोरा मंडळात ६६ मि.मी. पाऊस झाला. सेलू तालुक्यातील देऊळगाव मंडळातही ६६.८ मि.मी. पाऊस झाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात यंदा सर्वदूर विक्रमी पाऊस पडत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पावसाचा जोर दिसत असल्याने मका आणि कापसाला याचा सर्वाधिक फटका बसत आहे. जिल्ह्यातील वैजापूर, पैठण, खुलताबाद, सिल्लोड, कन्नड, फुलंब्री, सोयगाव तालुक्यातील बहुतांश गावात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे़ मागील दोन दिवसांपासून अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत़ कळंब तालुक्यात सर्वाधिक ३८.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती़ तसेच तुळजापूर, परंडा, भूम तालुक्यातही चांगला पाऊस झाला़ उस्मानाबाद शहर व परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली़  नांदेड जिल्ह्यात हदगाव तालुक्यातील निवघा महसूल मंडळात सोमवारी सकाळी ८३.२५  मि.मी. ची अतिवृष्टी झाली. हदगाव, भोकर, किनवट, लोहा, उमरी तालुक्यातही सरी कोसळल्या. बीड जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. माजलगाव धरणाचे ११ दरवाजे उघडण्यात आले.

पैनगंगेत वाहून गेल्याने शेतमजुराचा मृत्यू
मांडवी (जि. नांदेड) : येथील सचिन नरेंद्र चव्हाण या शेतमजुराचा शेतातून घरी परत येताना पैनगंगा नदीत वाहून गेल्याने मृत्यू झाला. जिल्ह्यातील खंबाळा येथील या २३ वर्षीय शेतमजूर तरुणाचा मृतदेह विदर्भातील राजापेठ शिवारात मच्छीमारी करणाऱ्यांना सोमवारी सापडला. त्यानंतर हा मृतदेह खंबाळा येथे आणण्यात आला. किनवटचे तहसीलदार उत्तमराव कागणे यांनी खंबाळा येथे भेट देऊन पाहणी केली.

मांजरा प्रकल्पात ७२.७२ टक्के पाणीसाठा
लातूर शहर व जिल्ह्यात सोमवारी दमदार पाऊस झाला. गेल्या दोन दिवसांपासून परतीचा पाऊस सुरूआहे.  लातूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या मांजरा प्रकल्पात गेल्या १ जूनपासून पाण्याचा येवा सुरू आहे. सोमवारी प्रकल्पात ७२.७२ टक्के पाणीसाठा झाल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला असून, लातूरसह केज, अंबाजोगाई, धारूर, लातूर एमआयडीसी, औसा एमआयडीसीच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मिटला आहे. शिरूर अनंतपाळ, औसा, निलंगा तालुक्यांत चांगला पाऊस झाला.

Web Title: Excessive rainfall in seven circles in Marathwada; Crop again in 15 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.