एसईबीसी वगळून उर्वरित उमेदवारांना तात्काळ तलाठीपदी नियुक्त्या द्या

By | Updated: November 28, 2020 04:14 IST2020-11-28T04:14:16+5:302020-11-28T04:14:16+5:30

एसईबीसी वगळून उर्वरित उमेदवारांना तलाठीपदी नियुक्ती देण्याबाबत शासनाने २५ नोव्हेंबरपर्यंत निर्णय घेण्याचा आदेश खंडपीठाने ६ नोव्हेंबरला शासनाला दिला ...

Except SEBC, appoint the remaining candidates as Talathis immediately | एसईबीसी वगळून उर्वरित उमेदवारांना तात्काळ तलाठीपदी नियुक्त्या द्या

एसईबीसी वगळून उर्वरित उमेदवारांना तात्काळ तलाठीपदी नियुक्त्या द्या

एसईबीसी वगळून उर्वरित उमेदवारांना तलाठीपदी नियुक्ती देण्याबाबत शासनाने २५ नोव्हेंबरपर्यंत निर्णय घेण्याचा आदेश खंडपीठाने ६ नोव्हेंबरला शासनाला दिला होता. त्यानुसार शुक्रवारच्या सुनावणीवेळी महसूल विभागाच्या प्रधान सचिवांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेले पत्र खंडपीठात सादर केले. एसईबीसी वगळून उर्वरित उमेदवारांना तलाठीपदी नियुक्ती द्यावी, असे पत्रात म्हटले आहे. त्यावरून खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला.

राज्य शासनाने २०१९ साली राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तलाठी भरती प्रक्रिया राबविली. यानुसार बीड जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती दिली नाही. म्हणून श्रीराम येवले व इतर ४२ उमेदवारांनी ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली होती. निवड झालेल्या उमेदवारांपैकी ७ उमेदवार मराठा आरक्षण (एसईबीसी) प्रवर्गातील आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिली असल्यामुळे काय निर्णय घ्यावा, याबाबत त्यांनी राज्य शासनाकडे मार्गदर्शन मागविले होते.

Web Title: Except SEBC, appoint the remaining candidates as Talathis immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.