शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
6
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
7
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
8
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
9
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
10
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
11
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
12
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
13
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
14
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
15
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
16
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
17
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
18
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
19
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
20
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
Daily Top 2Weekly Top 5

तेर येथील उत्खननात पाणी व्यवस्थापनाचे अवशेष हाती !

By admin | Updated: March 26, 2015 00:55 IST

तेर : उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे राज्याच्या पुरातत्त्व विभागामार्फत २८ जानेवारी २०१५ पासून उत्खननाला सुरुवात करण्यात आली

तेर : उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे राज्याच्या पुरातत्त्व विभागामार्फत २८ जानेवारी २०१५ पासून उत्खननाला सुरुवात करण्यात आली. २५ मार्च रोजी उत्खननावेळी पथकाच्या हाती सातवाहन काळातील सांडपाणी व्यवस्थापनाचा पुरावा हाती लागला आहे. तेर या गावामध्ये शासनाच्या पुरातत्व विभागाच्या वतीने जवळपास सहावेळा उत्खनन करण्यात आले. उत्खनना दरम्यान विविध प्रकारच्या पुरातन वस्तू आढळून आल्या आहेत. २८ जानेवारीपासून सुरु झालेल्या उत्खननात सातवाहन काळातील भिंतीचे अवशेष, तांब्याची नाणी, शंखापासून बनविलेले वेगवेगळे दागीने, विविध अलंकार, खापराची भांडी, रांजन, जळालेले गहू, तुरीची दाळ, तांदूळ अशा जवळपास हजारापेक्षा जास्त वस्तू आढळून आल्या आहेत. जवळपास दोन महिन्यांपासून चालू असलेले हे उत्खनन २६ मार्चपासून बंद करण्यात येणार आहे. बुधवारी कोटटेकडी भागात उत्खनन सुरु असताना सातवाहन काळातील सांडपाणी व्यवस्थापनाचा पुरावा हाती लागला आहे. सातवाहन काळात सांडपाणी व्यवस्थापन केले जात असल्याचे पुरातत्त्च विभागाच्या संचालिका माया पाटील यांनी सांगितले. तर या अवशेषामुळे अभ्यासात मोठ्या प्रमाणात भर पडणार असल्याचे सहाय्यक संचालक विलास वाहने यांनी नमूद केले. जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेटतेर येथे सुरु असलेले उत्खनन स्थळास जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी बुधवारी भेट दिली. उत्खननातील विविध बाबींची यावेळी माहिती घेतली. उपसंचालिका माया पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली. (वार्ताहर)४२७ मार्चला या सर्व मिळालेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनासाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे आदींना आमंत्रित करण्यात आले आहे.