शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेच्या निकालानंतर विद्यार्थ्यांच्या परीक्षा; विद्यापीठाला दिवाळीच्या सुट्या २६ ऑक्टोबरपासून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 17:32 IST

विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग व धाराशिव उप परिसरास २६ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या दरम्यान सुट्या राहतील.

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग व संलग्नित महाविद्यालयांना येत्या २६ ऑक्टोबरपासून दिवाळीच्या सुट्या जाहीर करण्यात आल्याची माहिती शैक्षणिक विभागाचे उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी दिली.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांचे वेळापत्रक एप्रिलमध्येच जाहीर केले हाेते. त्यानुसार १५ जून ते २५ ऑक्टोबर या काळात प्रथम सत्र असणार आहे. विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग व धाराशिव उप परिसरास २६ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या दरम्यान सुट्या राहतील. हे विभाग ११ नोव्हेंबर रोजी सुरू होणार असून, १ मे पर्यंत द्वितीय सत्र असणार आहे. तर संलग्नित महाविद्यालयांच्या २६ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या दरम्यान दिवाळी सुट्या असणार आहेत, तर १६ नोव्हेंबर ते १ मे २०२५ या काळात द्वितीय सत्र असणार आहे.

विधानसभेच्या निवडणुकीनंतर परीक्षापदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षाही दिवाळीनंतर तसेच विधानसभा निवडणुकीनंतर होणार आहेत. पूर्वी या परीक्षा १२ नोव्हेंबर रोजी सुरू होणार होत्या. मात्र, आता परीक्षा निवडणूक निकालानंतर होणार आहेत. पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा २६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. यामध्ये सर्व परंपरागत अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा समावेश आहे, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा डिसेंबर महिन्यात सुरू होतील, अशी माहिती परीक्षा विभागातील समन्वयक भगवान फड यांनी दिली.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र