माजी नगरसेवकाच्या मुलाची वृद्धास बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:03 IST2021-09-23T04:03:56+5:302021-09-23T04:03:56+5:30

औरंगाबाद : माजी नगरसेवकाच्या मुलाने दोन साथीदारांच्या मदतीने एका ५८ वर्षांच्या वृद्धास उड्डाणपुलाच्या बाजूला नेऊन बेदम मारहाण केल्याची घटना ...

Ex-corporator's son beaten to death | माजी नगरसेवकाच्या मुलाची वृद्धास बेदम मारहाण

माजी नगरसेवकाच्या मुलाची वृद्धास बेदम मारहाण

औरंगाबाद : माजी नगरसेवकाच्या मुलाने दोन साथीदारांच्या मदतीने एका ५८ वर्षांच्या वृद्धास उड्डाणपुलाच्या बाजूला नेऊन बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि.२०) रात्री आठ वाजता महाजन कॉलनी येथील एका पान टपरीजवळ घडली. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अगरबत्ती विक्रीचा व्यवसाय करणारे फिर्यादी अशोक गणपतराव कुलकर्णी (रा.एम-२/१८, ठाकरेनगर, एन-२ सिडको) यांना एका अनोळखी व्यक्तीने दगड मारला होता. या विषयी तक्रार देण्यासाठी ते पोलीस ठाण्याकडे जात असताना, मुकुंदवाडी बसस्टॉपजवळ पोहोचले. ‘काका आम्ही तुम्हाला तुमच्या घरी सोडतो, तुम्हाला पोलिसांची आवश्यकता नाही,’ असे म्हणून अशोक कुलकर्णी यांना सागर लॉन्स उड्डाणपुलाच्या पलीकडे घेऊन गेले. त्या ठिकाणी दामूअण्णा शिंदे यांचा मुलगा शिवराज शिंदे व त्याच्यासोबतच्या दोन मित्रांनी कुलकर्णी यांना बेदम मारहाण केली. पाठीवर आणि हातावर दांडक्याने मारत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. यावरून मुकुंदवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवराज शिंदे हा माजी नगरसेवकाचा मुलगा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अधिक तपास पोलीस नाईक मुळे करीत आहेत.

Web Title: Ex-corporator's son beaten to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.