विकासाची फळे सर्वांना समान मिळाली पाहिजेत -अरुणकुमार
By Admin | Updated: August 23, 2014 00:45 IST2014-08-22T23:48:31+5:302014-08-23T00:45:58+5:30
समाजातील विषमतेची दरी कमी होऊन सर्वांना समान संध मिळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ. भा. सहसंपर्क प्रमुख अरुणकुमार यांनी केले.

विकासाची फळे सर्वांना समान मिळाली पाहिजेत -अरुणकुमार
परभणी : स्वातंत्र्यानंतर भारताने सर्वच क्षेत्रात प्रगती केली. परंतु दुसरीकडे या विकासाचे सार्वत्रिकीकरण करणेही तितकेच आवश्यक ठरते. असमान विकास हा घातक ठरु शकतो. त्यामुळे समाजातील विषमतेची दरी कमी होऊन सर्वांना समान संध मिळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ. भा. सहसंपर्क प्रमुख अरुणकुमार यांनी केले.
येथील मेघालय छात्रावासात संत गाडगेबाबा अभ्यासिकेचे उद्घाटन अरुणकुमार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर जनकल्याण समितीचे संभाग कार्यवाह वसंतराव नायगावकर, जनकल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. राजगोपाल कालानी, भास्करराव भाले यांची प्रमुख उपस्थिती होती.अरुणकुमार म्हणाले, प्रत्येक बिजामध्ये महावृक्ष होण्याची ताकद असते. फक्त गरज आहे ती योग्य त्या पोषक वातावरणाची. त्याच पद्धतीने समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना या अभ्यासिकेचा उपयोग होऊन त्यांची सर्वांगिण उन्नती साधली जाईल. या प्रसंगी विविध स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अविनाश अंभोरे, कानबा हराळ, तिथे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन आनंद कुलकर्णी तर प्रास्ताविक अनिल रामदासी यांनी केले. वैशाली मुळे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी विजय पेशकार, राहुल झांबड, डॉ. आनंद उंडेगावकर, प्रसाद देशमुख, राजन मानकेश्वर, संजय कुंभकर्ण, शंकर आजेगावकर, राजीव महेंद्रेकर, भास्कर देशपांडे, प्रकाश कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)