जिल्ह्यात दर तीन दिवसांत एक अर्भक तोडतेय दम !

By Admin | Updated: June 8, 2014 00:56 IST2014-06-08T00:32:09+5:302014-06-08T00:56:12+5:30

बाबूराव चव्हाण , उस्मानाबाद अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. या माध्यमातून ग्रामीण भागातील अर्भक मृत्यूदर खाली आला आहे.

Every three days in the district an infant broke down! | जिल्ह्यात दर तीन दिवसांत एक अर्भक तोडतेय दम !

जिल्ह्यात दर तीन दिवसांत एक अर्भक तोडतेय दम !

बाबूराव चव्हाण , उस्मानाबाद
अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. या माध्यमातून ग्रामीण भागातील अर्भक मृत्यूदर खाली आला आहे. त्याच्या तुलनेत शहरी भागात अर्भक मृत्यूचे प्रमाण काही केल्या कमी होत नाही. उलटपक्षी २००८ च्या तुलनेत हे प्रमाण वाढले आहे. ही बाब संपूर्ण आरोग्य यंत्रणेच्या दृष्टिकोनातून चिंतेची मानली जात आहे. मागील सहा वर्षामध्ये ८२४ अर्भके दगावली. सरासरी तीन दिवसाला एक अर्भक मृत्यू पावत आहे. हे चिंताजनक चित्र बदलण्यासाठी आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून जाणीवपूर्वक प्रयत्न होणे गरजेचे आहे.
अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने वेगवेगळ्या योजना, उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये जननी सुरक्षा योजना, जननी शिशुसुरक्षा योजना, राष्ट्रीय लसीकरण अभियान आदी योजनांचा समावेश आहे.‘एनआरएचएम’च्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करण्यात येत आहेत. तसेच लहान बाळासाठी प्रत्येक जिल्हा रुग्णालयामध्ये ‘केअर युनिट’ सुरू करण्यात आले आहे. यासाठी तज्ज्ञ डॉक्टर कार्यरत आहेत. या माध्यमातून अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी करणे हा मुख्य उद्देश आहे. प्रत्यक्षात ग्र्रामीण भागातील अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी झाले असले तरी नगरपालिका क्षेत्रात हे प्रमाण वाढत चालले आहे. पुढारलेला भाग म्हणून शहरांची ओळख असते. मात्र याच पुढारलेल्या भागातच अर्भक मृत्यूचे प्रमाण २००८ च्या तुलनेत वाढले आहे. ही बाब सर्वांच्याच दृष्टिकोनातून चिंतेची आणि तितकीच लाजीरवाणी आहे.
२००८ मध्ये ७७ स्त्री तर ८१ पुरुष अर्भकाचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला. यामध्ये ग्रामीण भागातील केवळ ७ अर्भकांचा समावेश होता. उर्वरित सर्व अर्भके ही शहरी भागातील होती. विशेष म्हणजे जिल्ह्याचे ठिकाण म्हणून ओळखले जाणाऱ्या उस्मानाबाद पालिका क्षेत्रात सर्वाधिक १४९ अर्भके दगावली होती. २००९ मध्ये हे प्रमाण आणखी वाढले. ६१ स्त्री अर्भके तर १०५ पुरुष जातीची अर्भके दगावली. यावेळीही पालिका क्षेत्रामध्ये दगावलेल्या अर्भकांची संख्या १२४ इतकी होती. तर ग्रामीण भागातील हा आकडा ४२ वर गेला होता. २०१० मध्ये अर्भक मृत्यूचे प्रमाण किंचीत कमी झाले. या वर्षामध्ये १२३ अर्भके दगावली. यामध्ये स्त्री आणि पुरुष जातीची अनुक्रमे ५२ व ७१ इतकी संख्या होती. ग्रामीण भागात केवळ ३ अर्भके दगावली. तर उर्वरित १२० अर्भके ही पालिका क्षेत्रात दगावली आहेत.
दरम्यान, २०११ मध्ये अर्भक मृत्यूचे प्रमाण पुन्हा वाढले. जवळपास १७५ चा आकडा पार केला. ग्रामीण भागातही अर्भक मृत्यूचे प्रमाण वाढले. शहरी भागामध्ये १३७ तर ग्रामीण भागामध्ये ५१ अर्भके दगावली. त्यानंतर २०१२ मध्ये हे प्रमाण बऱ्याचअंशी कमी झाले. ग्रामीण भागामध्ये ६ तर शहरी भागामध्ये ७९ अर्भके दगावली. यामध्ये स्त्रीजातीची ३९ तर पुरुष जातीच्या ४६ अर्भकांचा समावेश आहे. २०१२ मध्ये हे प्रमाण कमी झालेले असतानाच २०१३ मध्ये अर्भक मृत्यूचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी वेगवेगळ्या योजना, उपक्रम राबविण्यात येत असताना वाढलेली संख्या कुठेतरी संशोधन करण्यास भाग पाडणारी आहे. सरत्या वर्षामध्ये ग्रामीण भागात स्त्री जातीची ८ आणि पुरुष जातीची ७ अशी १५ अर्भके दगावली. त्याच्या उलट शहरी भागात जेथे सुशिक्षितांचे प्रमाण अधिक असते अशा पालिका क्षेत्रात ८९ अर्भकांनी दम तोडला. सदरील परिस्थिती सुधारण्यासाठी आता विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे.
अर्भक मृत्यूचे वर्षनिहाय प्रमाण
वर्षस्त्रीपुरूष
२००८७७८१
२००९६११०५
२०१०५२७१
२०११८३१०५
२०१२३९४६
२०१३४८५६

Web Title: Every three days in the district an infant broke down!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.