आजही बत्ती गुल होणार
By Admin | Updated: June 20, 2014 01:10 IST2014-06-20T00:59:03+5:302014-06-20T01:10:20+5:30
औरंगाबाद : शहरातील वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणेच्या देखभाल, दुरुस्तीचे मान्सूनपूर्व काम मागील अडीच महिन्यांपासून जीटीएल कंपनी करीत आहे.

आजही बत्ती गुल होणार
औरंगाबाद : शहरातील वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणेच्या देखभाल, दुरुस्तीचे मान्सूनपूर्व काम मागील अडीच महिन्यांपासून जीटीएल कंपनी करीत आहे. पावसाळा सुरू होऊन १३ दिवस पूर्ण झाले; पण अजूनही मान्सूनपूर्व कामे सुरूच आहेत. अजूनही दुरुस्तीचे काम कंपनीकडून
होईना.
उद्या २० रोजी शहरातील सातारा, दिशानगरी, इंदिरानगर, शहा कॉलनी व छावणी परिसरात विद्युत यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने दिवसभर वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
जीटीएलच्या वतीने उद्या शुक्रवारी सातारा परिसरातील दिशानगरी फिडरवरील ११ के. व्ही. वीज वाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे संपूर्ण सातारा परिसरात पाच तासांपेक्षा अधिक काळ विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. कंपनीने अशी अधिकृत घोेषणा केली असली तरीही या परिसरात मात्र, मागील वर्षभरापासून दररोज अघोषित भारनियमन केल्या जात आहे.
किती दिवस छळणार
मान्सूनपूर्व देखभाल, दुरुस्तीच्या नावाखाली दर शुक्रवारी विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत आहे. या छुप्या भारनियमनाने नागरिकांना हैराण केले. आता शुक्रवारीच नव्हे तर कधीही विद्युत पुरवठा खंडित होत असून, आणखी किती दिवस जीटीएल शहरवासीयांना छळणार आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया प्रमोद भोपालकर, दिनेश मिटकर, किरण सराफ, सुहास देशपांडे या नागरिकांनी व्यक्त केल्या.