शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

दोन तास खल झाला, तरी जलवाहिनीच्या कामातील तांत्रिक चूक कुणी केली हे गुलदस्त्याच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 20:00 IST

पैठण ते छत्रपती संभाजीनगर या ३० मीटर रुंदीच्या रस्त्यालगत ८ मीटर अंतरात १२०० मिमी जलवाहिनीच्या बाजूने नवीन २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या दोनही विभागांनी पैठण ते छत्रपती संभाजीनगर रस्ता व त्याच रस्त्यालगत होत असलेल्या शहर पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीच्या कामात घातलेल्या तांत्रिक घोळावर सोमवारी मंत्री, लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी दोन तास खल घातला. परंतु, तांत्रिक चूक किती अंतरात व कुणी केली, हे समोर आलेच नाही.

आता सगळ्या तांत्रिक यंत्रणांनी रस्ता व जलवाहिनीच्या कामाची संयुक्तिक पाहणी करून चार दिवसांत अहवाल देण्याचे आदेश सोमवारच्या बैठकीत देण्यात आले. तांत्रिक पाहणीसाठी मनपा आयुक्त जी. श्रीकांत लीड करतील, असे बैठकीत ठरले. ‘लोकमत’ने जलवाहिनी व रस्त्याच्या कामातील तांत्रिक घोळाचे प्रकरण चव्हाट्यावर आणल्यावर सगळ्या यंत्रणा खडबडून जागा झाल्या आहेत.

पैठण ते छत्रपती संभाजीनगर या ३० मीटर रुंदीच्या रस्त्यालगत ८ मीटर अंतरात १२०० मिमी जलवाहिनीच्या बाजूने नवीन २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. जमिनीखाली मंजूर जलवाहिनी टाकल्यास व त्यावरून रस्ता गेला असेल, तर भविष्यात जलवाहिनीची देखभाल करण्याविषयी निर्माण होऊ शकणाऱ्या प्रश्नांबाबत व याबाबतच्या तांत्रिक शक्यतांवरून बैठकीत एमजेपी आणि एनएचएआयच्या जबाबदार अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींनी झापले.

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, खा. संदीपान भुमरे, खा. डॉ. कल्याण काळे, आ. अनुराधा चव्हाण, मजिप्राच्या मुख्य अभियंता मनिषा पलांडे, अभियंता दीपक कोळी, मनोज पाठक, एनएचएआयचे प्रकल्प संचालक रवींद्र इंगोले, अनिकेत कुलकर्णी, मनपा मुख्य अभियंता ए. बी. देशमुख, अभियंता किरण पाटील, जीव्हीपीआर कंपनीचे जी. मेहंदर, खलील अहमद आदींची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी कार्यान्वयन यंत्रणांनी समन्वयाने वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले. मनपा आयुक्त जी. श्रीकांत म्हणाले, सात दिवसांनंतर किती अंतरात तांत्रिक अडचण आहे, हे समोर येईल.

हे प्रश्न अनुत्तरीतच राहिलेभविष्या रस्त्याखालील जलवाहिनी फुटल्यास दुरुस्ती कशी करणार, कॅरेज-वे वरून वाहने गेल्यास काय करणार, एमजेपी, एनएचएआय या संस्थेने त्यांच्या कामाचा स्वार्थ पाहिला काय, ३५ किमी जलवाहिनी टाकली आहे. किती किमी अंतरात रस्त्याखाली जलवाहिनी दबली आहे. २० किमी अंतरात हा तांत्रिक घोळ नसल्याचा दावा अचानक का केला जात आहे, एन-केसिंग, डक्ट करणे शक्य नाही. मग उपाय काय करणार हे अद्याप स्पष्ट नाही.

जलवाहिनी योजनेच्या कामांतील महत्त्वाचे दावे असे२०१९ मध्ये नगरोत्थानअंतर्गत शहर पाणीपुरवठा योजनेला मान्यता.२०२१-२२ मध्ये अमृत २.० योजनेत समावेश, सुधारीत मंजुरी मिळाली.१८०८ कोटी ३९ पैकी १५८३ कोटी ३२ लाख कंत्राटदाराला दिले.जॅकवेलचे भिंतीचे ११.९ मीटर उंचीपर्यंत, तर वर्तुळाकार भिंतीचे २२.७ मीटरपर्यंत पूर्ण.मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम ८८ टक्के पूर्ण झाले आहे. पुलाचे काम ७५ टक्के पूर्ण.जलाभिसरण कारंजाचे ९० टक्के, आऊटलेट चेंबर ७२ टक्के, सीएलफचे काम ९५ टके पूर्ण.पंप, केमिकल हाऊसचे काम ७० टक्के पूर्ण.४७ उंच जलकुंभ व ३ बैठे जलकुंभ, असे एकूण ५० जलकुंभ बांधणे सुरू आहे.७ उंच जलकुंभ, तर २ बैठे जलकुंभांचे काम पूर्ण.उर्वरीत जलकुंभांचे काम ९० टक्क्यांपर्यंत गेले आहे.

चाचणीनंतरच कंत्राटदाराचे बिल द्यारस्त्याचे व जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर जलवाहिनीची देखभाल दुरुस्ती करताना रस्ता खोदावा लागू नये. यासाठी सगळ्या यंत्रणांनी मिळून संयुक्त तांत्रिक पाहणी करावी. चार दिवसांत त्याचा अहवाल द्यावा. मार्च २०२५ पर्यंत पहिल्या टप्प्यातील २०० दलघमी पाणी शहराला पुरवठा होईल, यासाठी प्रयत्न करा. या कामाची हायड्रॉलिक तसेच रेडिओग्राफिक चाचणी घेतल्यानंतरच ठेकेदाराेचे देयक अदा करावे.- अतुल सावे, ओबीसी कल्याण मंत्री

योजना पुढील ५० वर्षांसाठीही योजना आगामी ५० वर्षांसाठी तयार केली आहे. लोकांना पाणी मिळावे, पैठणकडे जाणारी, तसेच बिडकीन व चितेगाव या रस्त्यालगतच्या गावातील रहदारी सुरळीत व्हावी, यादृष्टीने उपाययोजना करा.- संदीपान भुमरे, खासदार.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMuncipal Corporationनगर पालिकाWaterपाणी