शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

यंदाच्या उन्हाळ्यातही घशाला कोरडच; शहराच्या पाण्यात वाढ करण्याचा प्रयोग पुन्हा लांबला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 15:47 IST

शहराला रोज किमान २०० एमएलडी पाण्याची गरज आहे. जायकवाडी धरणातून फक्त १२५ एमएलडी पाणी मिळते.

औरंगाबाद : जायकवाडीहून शहरासाठी वाढीव पाणी आणावे अशी मागणी मागील दोन दशकांपासून औरंगाबादकर करीत आहेत. शहरात वाढीव पाणी आणणार अशी गेले वर्षभर घोषणा करणारी महापालिका व शासनाने आता वाढीव पाणी आणण्याचा प्रयोग तहकूब केल्याने यंदाच्या उन्हाळ्यातही शहराच्या घशाला कोरड पडणार, हे स्पष्ट झाले. पावसाळ्यानंतरच नवीन सात किलोमीटर जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू होऊ शकते.

शहराला रोज किमान २०० एमएलडी पाण्याची गरज आहे. जायकवाडी धरणातून फक्त १२५ एमएलडी पाणी मिळते. जास्तीचे पाणी आणण्याची क्षमता महापालिकेच्या दोन्ही जलवाहिन्यांमध्ये नाही. जलवाहिन्यांसह उपसा करणाऱ्या मोटारींचे आयुष्य २० वर्षांपूर्वीच संपले आहे. फारोळा ते नक्षत्रवाडीपर्यंत अनेक ठिकाणी जलवाहिनीची जाडी कमी झाली. पाण्याचा वेग व दाब जराही वाढला तरी जलवाहिनी फुटते. शहरातील पाणीप्रश्नी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी २० एमएलडी पाणी वाढवण्यात येईल, अशी घोषणा केली होती. वर्ष संपत आले तरी अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे यंदाही उन्हाळ्यात औरंगाबादकरांच्या नशिबी पाणी... पाणी... करण्याची वेळ येणार, हे निश्चित.

२०० वसाहती टँकरवरशहरातील २०० पेक्षा अधिक वसाहतींना मागील १० वर्षांपासून टँकरद्वारे तहान भागवावी लागते. या वसाहतींमध्ये जलवाहिन्याच टाकण्यात आलेल्या नाहीत. ३०० रुपये दरमहा देऊन आठवड्यातून दोनदा एक ड्रम पाणी मिळते. वापरण्यासाठी नागरिकांना वेगळे पैसे खर्च करून पाणी घ्यावे लागते. शहराचे पाणी वाढविण्यासाठी महापालिकेतील सत्ताधारी, प्रशासनाने कधीच लक्ष दिले नाही, हे विशेष.

पाच दिवस, आठ दिवसांआड पाणीशहरातील वेगवेगळ्या भागांत महापालिकेकडून सोयीनुसार पाणीपुरवठा करण्यात येतो. सर्व वसाहतींना दिवसाआड पाणी द्या, एवढी साधी मागणीही मान्य होत नाही. काही भागांत पाच दिवसाआड, तर काही भागांत आठ दिवसांआड पाणीपुरवठा होतो.

७ कि.मी. जलवाहिनी आवश्यकनवीन पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत सध्या अस्तित्वात असलेल्या जलवाहिनीतूनच २० एमएलडी पाणी अधिक खेचावे लागणार आहे. सध्याच्या दोन्ही पाणीपुरवठा योजना कालबाह्य झाल्यामुळे जलवाहिनी अनेकदा फुटते. त्यामुळे क्रॉस कनेक्शन करावे लागणार आहे. त्यासाठी सात किलोमीटर नवीन जलवाहिनी टाकावी लागणार आहे. पाईपनिर्मितीचे काम वेगात आल्यावरच हे काम शक्य आहे.- अजय सिंह, अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी