शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांचीही आता पळवापळवी; नवी रुग्णालये देताहेत  गलेलठ्ठ पगाराची ऑफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 14:03 IST

अधिक वेतन मिळत असल्याने छोटी रुग्णालये बंद करून मोठ्या रुग्णालयांत रुजू होण्याकडे डॉक्टरांचा कल वाढत आहे.

ठळक मुद्देखाजगी रुग्णालयांमध्ये जोरदार स्पर्धा शहरात खाजगी रुग्णालयांची संख्या ४५८ वर

औरंगाबाद : औरंगाबाद हे आता मेडिकल हब म्हणून उदयास येत आहे. मल्टिस्पेशालिस्ट, सुपरस्पेशालिटी आणि कॉर्पोरेट रुग्णालयांचे जाळे औरंगाबादेत वाढत आहे. शहरात नवीन रुग्णालय सुरू करताना डॉक्टरांना गलेलठ्ठ पगाराची ऑफर, पॅकेज देऊन नियुक्ती दिली जात आहे. अधिक वेतन मिळत असल्याने छोटी रुग्णालये बंद करून मोठ्या रुग्णालयांत रुजू होण्याकडे डॉक्टरांचा कल वाढत आहे. शहरातील वैद्यकीय सेवेचा गेल्या काही वर्षांत विस्तार झाला असून, खाजगी रुग्णालयांची संख्या ४५८ वर गेली आहे. गेल्या ५ वर्षांत ७७ वर नवीन रुग्णालये सुरू झाली आहेत. 

अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे होणाऱ्या उपचारपद्धतीमुळे जिल्ह्यासह मराठवाड्यातील रुग्णांना पुणे, मुंबईला जाण्याची गरज राहिलेली नाही.  शहरातील जालना रोडलगत गेल्या काही वर्षांत खाजगी रुग्णालयांची संख्या वाढली आहे. चिकलठाणा ते भगवान महावीर चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा खाजगी रुग्णालये उभी राहिली आहेत. जालना रोडपाठोपाठ बीड बायपासवरदेखील ठिकठिकाणी नवीन रुग्णालये सुरू झाली आहेत. मुंबईसह अन्य शहरांमध्ये असलेल्या रुग्णालयांच्या शाखाही औरंगाबादेत सुरू करण्यास प्राधान्य दिले जात आहे. प्रसूतिशास्त्र, अस्थिव्यंगोपचारासह हृदयविकार,मूत्रपिंडविकार, मेंदूविकार, पोटाचे विकार यातील सुपरस्पेशालिटी रुग्णालये कार्यान्वित झाली आहेत. नव्याने रुग्णालय सुरू करताना शहरात कार्यरत डॉक्टरांना लाखो रुपयांच्या वेतनाचे पॅकेज दिले जात आहे. 

वेतन, वीजबिलासह अनेक खर्चरुग्णालयातील मनुष्यबळाचे वेतन, वीजबिल, जागेचे भाडे, नियमांच्या पूर्ततेसाठी खर्च अशा विविध गोष्टींसाठी रुग्णालयांना खर्च येतो. हा खर्च गेल्यानंतर उत्पन्न मिळते. हे सर्व करून छोटी रुग्णालये चालविण्याऐवजी मोठ्या रुग्णालयांत रुजू होण्याकडेही डॉक्टर वळत आहेत.

नव्या रुग्णालयांमुळे रुग्णसेवेत वाढशहरात मोठी रुग्णालये येणे, ही चांगली बाब आहे. त्यातून रुग्णसेवेत वाढ होते. मोठ्या रुग्णालयांमुळे नागरिकांना उपचारासाठी मुंबई, पुण्याला जावे लागत नाही. सुपरस्पेशालिटी डॉक्टर हे मोठ्या रुग्णालयात असतात. एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात रुजू होणे ही सामान्य बाब आहे.  - डॉ. शोएब हाश्मी, सचिव, मराठवाडा हाॅस्पिटल असोसिएशन

टॅग्स :doctorडॉक्टरAurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटल