सलग सुट्यानंतरही कर्मचाऱ्यांचे कामात मन भरेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:06 IST2020-12-30T04:06:31+5:302020-12-30T04:06:31+5:30
शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशा तीन दिवस सलग शासकीय सुट्या आल्या होत्या. त्यामुळे बहुतांश कर्मचारी आपल्या मूळगावी गेले होते. ...

सलग सुट्यानंतरही कर्मचाऱ्यांचे कामात मन भरेना
शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशा तीन दिवस सलग शासकीय सुट्या आल्या होत्या. त्यामुळे बहुतांश कर्मचारी आपल्या मूळगावी गेले होते. यासह अनेक अधिकारी-कर्मचारी शहरातून ये-जा करत असल्याने अशावेळी उशिराने कार्यालयात येत असल्याचे नेहमीचेच चित्र असते. तसाच काहीसा प्रकार सोमवारीसुद्धा तहसील कार्यालयात आढळून आला. अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयात येण्याची वेळ सकाळी पावणेदहाची आहे. मात्र, बहुतांश जण निर्धारित वेळेत येत नसल्याची स्थिती असल्याने कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्या दिसून आल्या.
----- कोट ----
सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे काम सुरू असल्याने अनेक कर्मचारी त्या कामासाठी बाहेर गेले आहेत. निवडणूक प्रशिक्षण केंद्राच्या पाहणीसह साहित्याच्या नोंदणीसाठी काही जण औरंगाबादला गेल्याने ते कार्यालयात दिसत नाहीत.
- हारुण शेख, नायब तहसीलदार
---------------