शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

संविधानातील नीतिमूल्ये ही बुद्धांच्या तत्त्वज्ञानातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 11:49 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात समता, स्वातंत्र आणि बंधुता ही लोकशाहीची तीन आधारमूल्ये फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतली आहेत, असा जाणीवपूर्वक खोटा आरोप आणि अपप्रचार केला जात आहे. बाबासाहेबांनी ही तीन आधारमूल्ये तथागत गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानातून संविधानात आधारभूत केलेली आहेत. हे तत्त्वज्ञान स्वदेशी आहे, ते पाश्चिमात्य देशाचे नाही, असे प्रतिपादन प्रा. श्रीकिशन मोरे यांनी केले.

ठळक मुद्देप्रा. श्रीकिशन मोरे : मा.प. विधि महाविद्यालयात व्याख्यानमालेचे पहिले पुष्प

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात समता, स्वातंत्र आणि बंधुता ही लोकशाहीची तीन आधारमूल्ये फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतली आहेत, असा जाणीवपूर्वक खोटा आरोप आणि अपप्रचार केला जात आहे. बाबासाहेबांनी ही तीन आधारमूल्ये तथागत गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानातून संविधानात आधारभूत केलेली आहेत. हे तत्त्वज्ञान स्वदेशी आहे, ते पाश्चिमात्य देशाचे नाही, असे प्रतिपादन प्रा. श्रीकिशन मोरे यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मा.प. विधि महाविद्यालयात तीनदिवसीय संविधान प्रबोधन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. आज बुधवारी सायंकाळी ‘संविधान निर्मिती व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानवाद’ या विषयारील पहिले पुष्प प्रा. श्रीकिशन मोरे यांनी गुंफले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी.एम. राव होते. सुरुवातीला प्रा. ललिता पवार यांनी संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन केले.प्रा. मोरे आपल्या व्याख्यानात म्हणाले, २६ नोव्हेंबर १९५० रोजी भारतीय संविधान अमलात आले. त्यापूर्वी या देशातील समाजव्यवस्थेचा विचार झाला पाहिजे. या देशातील अस्पृशांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता. अंगात वस्त्र परिधान करण्याचा अधिकार नव्हता. जनावरांपेक्षाही हीन दर्जाची वागणूक त्यांना दिली जात होती. देशात राजकीय स्वातंत्र्याची चळवळ अस्तित्वात होती; पण अस्पृशांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देण्यासाठी सामाजिक चळवळ अस्तित्वात नव्हती. त्यामुळे बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून या समाजाला अधिकार प्राप्त करून दिले. यापूर्वी १९३० मध्ये गोलमेज परिषेदसमोर बाबासाहेबांनी अस्पृशांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी लावून धरली. या मागणीला महात्मा गांधी यांनी कडाडून विरोध केला. एकीकडे महात्मा गांधी हे अस्पृशांच्या हक्कासाठी काम करीत आणि दुसरीकडे, अस्पृशांच्या अधिकाराला विरोध करीत. त्यामुळे बाबासाहेब हे गांधीजींचे वैचारिक विरोधक होते. बाबासाहेबांनी नोकरीत राखीव जागांचा आग्रह धरला, तसा मंत्रिमंडळातही राखीव जागांचा आग्रह धरला होता.त्यानंतर संविधानसभेसमोर बाबासाहेबांनी आपले विचार प्रकट केले. तेथेही बाबासाहेबांना विरोध करण्याचे षड्यंत्र रचण्यात आले; पण बाबासाहेब हे प्रकांड पंडित होते. मोठे कायदेपंडित होते. त्यांनी एकेक मुद्दा पटवून सांगितला. एकसंघ राष्ट्र कसे उभे राहील, याबद्दल सविस्तरपणे भूमिका मांडली. या देशातील महत्त्वाचे उद्योग हे राज्याच्या मालकीचे असावेत. कृषी क्षेत्राला उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे. या देशातील संपूर्ण जमीन ही देशाच्या मालकीची असली पाहिजे व येथील नागरिकांना तिचे समान वाटप झाले पाहिजे. जमीन कसण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारने पैसे दिले पाहिजेत. बाबासाहेबांचा हा विचार जर अमलात आला असता, तर देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या नसत्या. संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी रक्तविरहित सामाजिक क्रांती आणली, असे विचार प्रा. मोरे यांनी मांडले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रBuddhist Circuitsबुद्धिस्ट सर्किट