येसगाव येथे ग्रामरक्षक दलाची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:04 IST2021-07-15T04:04:41+5:302021-07-15T04:04:41+5:30

ग्रामरक्षक दलामध्ये येसगावातील २१ तरुणांची निवड करण्यात आली आहे. येसगाव नंबर १ च्या अध्यक्षपदी शेख जमीर ईसाक, उपाध्यक्ष- ...

Establishment of Gram Rakshak Dal at Yesgaon | येसगाव येथे ग्रामरक्षक दलाची स्थापना

येसगाव येथे ग्रामरक्षक दलाची स्थापना

ग्रामरक्षक दलामध्ये येसगावातील २१ तरुणांची निवड करण्यात आली आहे. येसगाव नंबर १ च्या अध्यक्षपदी शेख जमीर ईसाक, उपाध्यक्ष- राहुल रामदास खंडागळे, येसगाव नंबर २ च्या अध्यक्षपदी सतीश प्रभाकर खंडागळे, उपाध्यक्ष- विजय जनार्दन जाधव, तसेच येसगाव नंबर ३ अध्यक्षपदी दादासाहेब अंबादास खंडागळे, उपाध्यक्षपदी फकीरराव तुकाराम खंडागळे यांची निवड करण्यात आली. यावेळी सरपंच जिज्ञासा काळे, बीट जमादार संजय जगताप, नवनाथ कोल्हे, पोकॉ. विनोद बिघोत, योगेश नाडे, पोलीसपाटील शंकर काळे, तंटामुक्ती अध्यक्ष अशोक खंडागळे, विलास खंडागळे, मधुकर खंडागळे, ज्ञानेश्वर खरात, माजी उपसरपंच गणेश काळे, रामराव काळे, सुनील नरवडे, रामराव खंडागळे, राजू जाधव आदी उपस्थित होतेे.

फोटो कॅप्शन : येसगाव येथील ग्रामरक्षक दलाच्या स्थापनेप्रसंगी सरपंच जिज्ञासा काळे व ग्रामरक्षक दलाचे पदाधिकारी.

Web Title: Establishment of Gram Rakshak Dal at Yesgaon