स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रांची स्थापना
By Admin | Updated: October 12, 2014 00:28 IST2014-10-12T00:28:09+5:302014-10-12T00:28:09+5:30
औरंगाबाद : शहराची शिक्षण क्षेत्रात झालेली क्रांती पाहता ‘औरंगाबाद शैक्षणिक हब’ म्हणून पुढे येत आहे.

स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रांची स्थापना
औरंगाबाद : शहराची शिक्षण क्षेत्रात झालेली क्रांती पाहता ‘औरंगाबाद शैक्षणिक हब’ म्हणून पुढे येत आहे. एमपीएससी, यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांद्वारे करिअर करणाऱ्यांची संख्या शहरात वाढत आहे. या विद्यार्थ्यांसाठी पूर्व स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रांची स्थापना करण्याचा निश्चय राजेंद्र दर्डा यांनी केला आहे. युवकांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी असे अनेक महत्त्वाचे उपक्रम राबविणार असल्याचे व्हिजन औरंगाबादमध्ये अधोरेखित करण्यात आले आहे.
शिक्षण, क्रीडा, उद्योग, कला यासह विविध क्षेत्रांत युवकांसाठी नेहमीच संधी उपलब्ध करण्याचे काम राजेंद्र दर्डा यांनी केले आहे. शहरातील युवकांची विविध क्षेत्रांतील भरारी याचेच प्रतीक आहे.
विभागीय क्रीडा संकुलामुळे युवकांना क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचे बळ मिळाले, तर सिडको नाट्यगृहामुळे चित्रपट- नाट्य क्षेत्रात नावलौकिक करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले.
शहरातील उच्च व तंत्रशिक्षणात झालेली क्रांती पाहता पुणे- मुंबईत शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी आता औरंगाबादला प्रथम पसंती देत
आहेत.
राजेंद्र दर्डा यांनी आपल्या जाहीरनाम्यात अनेक महत्त्वाचे प्रकल्प राबविणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शहरात आमदार निधीतून ठिकठिकाणी जॉगिंग ट्रॅकची उभारणी करून युवकांना क्रीडा क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल. त्यासोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध उत्सव- महोत्सवांचे आयोजन करण्यात येणार आहे.
येथील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी राजेंद्र दर्डा यांनी औरंगाबादेत डीएमआयसी हा औद्योगिक प्रकल्प आणला आहे. त्यामुळे युवकांना अडीच लाख प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार
आहे.
औरंगाबादच्या युवकांचे भवितव्य उज्ज्वल आहे. त्यांनी व्यावसायिक व तंत्रशिक्षणाच्या माध्यमातून आपली जागा काबीज क रावी, असे आवाहन राजेंद्र दर्डा यांनी केले.