शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

’इस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट’ वैद्यकीय क्षेत्रास मारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:51 IST

आंतरराष्ट्रीय सुविधांशी तुलना करून त्या तोडीच्या सुविधा येथील डॉक्टरांनी द्याव्यात अशी शासनाची अपेक्षा आहे. त्यासाठी इस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट प्रस्तावित केला आहे. मात्र देशातील लहान व मध्यम लोकवस्तीच्या शहरांचा विचार केला तर वैद्यकीय व्यवसाय कॉर्पोरेट जगताच्या झोळीत टाकण्याचा शासनाचा घाट दिसून येत आहे, असे मत डॉ.अखिल अशोक अग्रवाल यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आंतरराष्ट्रीय सुविधांशी तुलना करून त्या तोडीच्या सुविधा येथील डॉक्टरांनी द्याव्यात अशी शासनाची अपेक्षा आहे. त्यासाठी इस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट प्रस्तावित केला आहे. मात्र देशातील लहान व मध्यम लोकवस्तीच्या शहरांचा विचार केला तर वैद्यकीय व्यवसाय कॉर्पोरेट जगताच्या झोळीत टाकण्याचा शासनाचा घाट दिसून येत आहे, असे मत डॉ.अखिल अशोक अग्रवाल यांनी व्यक्त केले.ते म्हणाले, या कायद्यामुळे दवाखान्याची जागा किती असावी, चांगला प्रशिक्षित व आवश्यक संख्येतील मनुष्यबळ, अद्ययावत आयसीयू सुविधा या सर्व बाबींचे बंधन घालण्याच्या तयारीत शासन आहे. नव्याने वैद्यकीय व्यवसाय करणाºया डॉक्टरला या सर्व बाबी एकाच वेळी उभ्या करणे अवघड होणार आहे. पर्यायाने अशी सुविधा देणाºया रुग्णालयात नोकरी पत्करावी लागू शकते. त्यामुळे या क्षेत्रालाही भविष्यात कॉर्पोरेट चेहरा मिळू शकतो. सध्या सगळीकडेच डॉक्टरांचा या कायद्याला असलेला विरोध त्यामुळे रास्त आहे.एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे डॉक्टर होणेच आता अवघड झाले आहे. पदवीचा अभ्यासक्रम साडेचार वर्षांचा, १ वर्षे आंतरवासिता व १ वर्षे ग्रामीण सेवेचा राज्य सरकारचा बॉण्ड आधी पूर्ण करावा लागणार आहे. नंतर पदव्युत्तर शिक्षणाची तीन वर्षे व एक वर्षाचा बॉण्ड आहे. त्यानंतर सुपरस्पेशालिटी व इतर बाबींची आणखी काही वर्षे शिकण्यात व सेवेत घालविली तर अर्धे वयच यात निघून जाणार आहे. त्यात सेवा ग्रामीण भागात द्यायची आहे जेथे सुविधाच नाहीत. तर लहान व मध्यम शहरातही त्या तोडीच्या सुविधा नसल्याने डॉक्टरांचा हा काळ वाया जात आहे. त्यामुळे शासनाने डॉक्टरांना सुसह्य होईल, असा यातून मार्ग काढला पाहिजे. त्याचबरोबर शासकीय सेवेतील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी तर अनेकदा आंदोलने झाली. मात्र शासन कोणताच उपाय करीत नाही.सुरक्षेपोटी शासनावर तोकडा भार पडेल मात्र डॉक्टर निर्भयपणे चांगली सेवाही देवू शकतील. रात्री-बेरात्रीही त्यांना चांगल्या वातावरणात ही सेवा देता येईल, असेही डॉ.अग्रवाल म्हणाले.