अंबाजोगाईत सर्वांनाच पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 23:40 IST2017-10-09T23:40:32+5:302017-10-09T23:40:32+5:30

तालुक्यातील मतदारांनी सर्वच पक्षांच्या उमेदवारांना संमिश्र प्रतिसाद दिला

Equal preference to all parties | अंबाजोगाईत सर्वांनाच पसंती

अंबाजोगाईत सर्वांनाच पसंती

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीची मतमोजणी सोमवारी ९ तास चालली. तालुक्यातील मतदारांनी सर्वच पक्षांच्या उमेदवारांना संमिश्र प्रतिसाद दिला. विजयी उमेदवारांनी अंबाजोगाई शहरातच विजयाचा आंनद साजरा करीत सर्व रस्ते गुलालमय केले. या निवडणूकीसाठी कटेकोट बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.
तालुक्यात ७१ ग्रामपंचायत निवडणूकीचा कार्यक्रमम जाहिर झाला होता. सहा ग्रामपंचायत बिनविरोध तर राक्षसवाडी येथील एका ग्रामपंचातीसाठी सरपंच पदासाठी अनुसूचित जमातीचा उमेदवार न मिळाल्याने येथील सरपंच पदाची निवडणूक झाली नाही. मतदारांनी सर्वच पक्षांच्या गटांना संमिश्र कल दिला. तालुक्यात निवडून आलेल्या ग्रामपंचायतीमध्ये पालकमंत्री पंकजा मुंडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार संगीता ठोंबरे, नंदिकशोर मुंदडा, राजिकशोर मोदी, राजेसाहेब देशमुख या सर्वांनाच मतदारांनी संमिश्र कौल दिला.
विजेत्या उमेदवारांचा पॅनलप्रमुखांसह पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी सत्कार केला.

Web Title: Equal preference to all parties