वैजापुरात पालिकेच्या वतीने पर्यावरण जनजागृती सायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:10 IST2021-01-13T04:10:04+5:302021-01-13T04:10:04+5:30
ठक्कर बाजार येथून निघालेल्या रॅलीला नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, मुख्याधिकारी भागवत बिघोत राजपूत, नगरसेवक दशरथ बनकर, स्वप्नील जेजूरकर, सखाहरी बर्डे, ...

वैजापुरात पालिकेच्या वतीने पर्यावरण जनजागृती सायकल रॅली
ठक्कर बाजार येथून निघालेल्या रॅलीला नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, मुख्याधिकारी भागवत बिघोत राजपूत, नगरसेवक दशरथ बनकर, स्वप्नील जेजूरकर, सखाहरी बर्डे, डॉ. नीलेश भाटिया, शैलेश चव्हाण, पारस घाटे, गौतम गायकवाड, नीलेश पारख, स्वच्छता दूत धोंडिरामसिंह राजपूत यांनी ध्वज दाखविला.
एक कि.मी. परिसरात सायकलस्वारांनी वसुंधरा अभियानाबाबत जनजागृती केली. स्वच्छतेच्या बाबतीतही जनजागृती केली. सहभागी सर्वांना नगराध्यक्षा व नगरसेवक, मुख्याधिकारी यांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र प्रदान
करण्यात आले. नगराध्यक्ष परदेशी व मुख्याधिकारी बिघोत यांनी स्पर्धकांचे स्वागत करून स्वच्छता व पर्यावरण संरक्षणाबाबत मार्गदर्शन केले. पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांचे नेतृत्व संजय घुगे यांनी केले. नोडल अधिकारी मयूर मोदानी, व्ही. एम. सपकाळ, प्राचार्य किशोर साळुंके, प्रमोद निकाळे, रमेश त्रिभुवन, सहायक अस्लम शेख, कैलास त्रिभुवन, अहमद शेख, महादेव चांदगुडे यांनी सहभाग नोंदविला. सूत्रसंचालन डी. डी. ठाकूर यांनी केले, आभार सपकाळ यांनी मानले.
----------------
फोटो :