शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या ‘स्थिर आकारा’मुळे उद्योजक अस्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 14:01 IST

सध्या उद्योगांची आर्थिक घडी रुळावर आलेली नाही आणि त्यात स्थिर आकाराचा भुर्दंड बसत असल्यामुळे उद्योजक हतबल झाले आहेत.

ठळक मुद्दे उद्योजकांना स्थिर आकार लावलेली चार महिन्यांची दिली बिले उद्योग संघटनांचे एकत्रित शिष्टमंडळ भेटणार मंत्र्यांना

औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे औरंगाबादच्या उद्योगांची मागील चार महिन्यांपासून आर्थिक घडी विस्कटलेली आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात उद्योगांना विजेचा स्थिर आकार न लावण्याचे शासनाने आश्वासन दिले होते. मात्र, महावितरणने स्थिर आकार लावलेली मागील चार महिन्यांची बिले दिल्यामुळे उद्योजक हादरून गेले आहेत. 

कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यामुळे २४ मार्चपासून लॉकडॉऊनची मालिका सुरू झाली. बहुतांश कामगार गावी गेले. देश-विदेशात लॉकडाऊनची परिस्थिती सारखीच असल्यामुळे ऑर्डर कमी झाल्या. अनेक उद्योगांचे आर्थिक गणित कोलमडले. अजूनही अनेक शहरांतील बाजारपेठा उघडल्या नसल्याने येथील उद्योगांची उत्पादन क्षमता अद्यापही ५० टक्क्यांच्या वर सरकलेली नाही. दुसरीकडे, एप्रिल, मे, जून, जुलै या चार महिन्यांत विजेच्या बिलात स्थिर आकार आकारला जाऊ नये, यासंदर्भात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे उद्योग संघटनांनी मागणी केली होती. त्यानुसार यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मिळाले होते. 

मात्र, आता चार महिन्यांच्या बिलासोबत महावितरणने मोठ्या प्रमाणात स्थिर आकार आकारला आहे. मोठ्या उद्योगांना प्रतिमहिना पाच लाखांपर्यंत, तर लघु, सूक्ष्म उद्योगांना दरमहा कमीत कमी २५ हजार रुपये स्थिर आकार आकारण्यात आला. चार महिन्यांचा हा स्थिर आकार तीन टप्प्यांत विभागून भरण्याच्या सूचना महावितरणने दिल्या आहेत. सध्या उद्योगांची आर्थिक घडी रुळावर आलेली नाही आणि त्यात स्थिर आकाराचा भुर्दंड बसत असल्यामुळे उद्योजक हतबल झाले आहेत. लॉकडाऊनच्या काळातील चार महिन्यांचा विजेचा स्थिर आकार रद्द करावा, या मागणीसाठी सर्व उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री, उद्योगमंत्री, तसेच ऊर्जामंत्र्यांना भेटणार आहे. 

उद्योगांची आर्थिक स्थिती नाजूकयासंदर्भात ‘सीएमआयए’चे अध्यक्ष कमलेश धूत यांनी सांगितले की, कोरोनाच्या संकटामुळे औरंगाबादचे अनेक उद्योग अखेरची घटिका मोजत आहेत. पुरेशा ऑर्डर नाहीत. कुशल कामगारांची टंचाई आहे. पूर्ण क्षमतेने बाजारपेठा सुरू नसल्यामुळे उत्पादनाला मागणी नाही. त्यामुळे उद्योगांची उत्पादन क्षमताही अर्ध्यावर आली आहे. उद्योगांची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे. या परिस्थितीत उद्योग बंद असलेल्या लॉकडाऊनच्या काळात उद्योगांना विजेचा स्थिर आकार लावू नये, या मागणीसंदर्भात सर्व उद्योग संटनांचे शिष्टमंडळ मंत्रिमहोदयांना या आठवड्यात भेटणार आहे. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणAurangabadऔरंगाबादMIDCएमआयडीसी