शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

विदेशातून रॉ-मटेरिअल मागविणे महागात पडले; बनावट ई-मेल आयडीच्या आधारे उद्योजकाला अठरा लाखाला फसवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2021 12:42 PM

२३ ऑक्टोबर २०२० रोजी देवळाणकर यांनी कंपनीच्या बँक खात्यावर २४५६७.७२ डॉलर (भारतीय चलनात १८ लाख २८ हजार ३१७ रुपये) ट्रान्स्फर केले.

ठळक मुद्देविदेशातून रॉ-मटेरिअल मागविणे महागात पडले

वाळूज महानगर : विदेशातून रॉ-मटेरियल पाठविण्याची थाप मारून बनावट मेल आयडीच्या आधारे वाळूज उद्योगनगरील एका उद्योजकाला सायबर भामट्याने सव्वा अठरा लाखांना गंडा घातला. या ऑनलाईन फसवणूक प्रकरणी अज्ञात सायबर भामट्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

विनायक शंकरराव देवळाणकर (एन ४, सिडको) यांची वाळूज एमआयडीसीत मनू इलेक्ट्रिकल नावाची कंपनी आहे. या कंपनीत लागणारा कच्चा माल देवळाणकर हे दक्षिण कोरियातील आय.के. टेक कंपनीकडून मागवत असतात. या विदेशी कंपनीचे औरंगाबादला वास्तव्यास असणारे प्रतिनिधी के. एल. ज्युंग यांच्या मदतीने ते माल मागवीत असतात. कच्चा माल घेण्यासाठी देवळाणकर यांनी ज्युंग यांच्या माध्यमातून कोरियाच्या कंपनीला ऑर्डर दिली होती. या ऑर्डरनंतर कंपनीकडून देवळाणकर यांना मेल पाठवून मालाचे पैसे कंपनीच्या खात्यावर टाकण्याची सूचना देण्यात आली. २३ ऑक्टोबर २०२० रोजी देवळाणकर यांनी कंपनीच्या बँक खात्यावर २४५६७.७२ डॉलर (भारतीय चलनात १८ लाख २८ हजार ३१७ रुपये) ट्रान्स्फर केले. दोन दिवसांनी देवळाणकर यांनी कंपनीचे प्रतिनिधी ज्युंग यांना फोन करून पैसे पाठविले असून माल केव्हा येणार अशी विचारणा केली. ज्युंग यांनी देवळाणकर यांना तुमचे पेमेंट कंपनीला पोहोचले किंवा नाही याची खात्री करून तुमचा माल पाठवितो असे सांगितले होते. २६ ऑक्टोबर रोजी ज्युंग यांनी देवळाणकर यांना पेमेंट आमच्या कंपनीला मिळाले नसल्याचे सांगितले.

बनावट मेल आयडीच्या आधारे घातला गंडादेवळाणकर यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता बँकेने पैसे पाठविल्याचे पुरावे दिले. देवळाणकर यांनी ज्युंग यांची भेट घेऊन त्यांना बँकेने दिलेली कागदपत्रे दाखविली असता त्यांनी तपासणी करून ते खाते आमच्या कंपनीचे नसल्याचे सांगितले. भामट्याने ज्युंग यांच्या मेल आयडीसारखाच दुसरा बनावट मेल आयडी तयार करून देवळाणकर यांनी पाठविलेले पैसे आपल्या खात्यात वळते केल्याचे समोर आले. देवळाणकर यांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधून या फसवणुकीची तक्रार केली होती. सायबर पोलिसांनी चौकशी करून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले. या प्रकरणी पुढील तपास दुय्यम पोलीस निरीक्षक पोतदार हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइमAurangabadऔरंगाबाद