शाळांत प्रवेशदिंडी, पुस्तकांचे वाटप

By Admin | Updated: June 17, 2014 00:40 IST2014-06-17T00:31:42+5:302014-06-17T00:40:30+5:30

हिंगोली : पहिल्याच दिवशी शाळांमध्ये प्रवेश दिंडी काढून विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गणवेशही वाटप करण्यात आला आहे.

Entrance to schools, distribution of books | शाळांत प्रवेशदिंडी, पुस्तकांचे वाटप

शाळांत प्रवेशदिंडी, पुस्तकांचे वाटप

हिंगोली : पहिल्याच दिवशी शाळांमध्ये प्रवेश दिंडी काढून विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गणवेशही वाटप करण्यात आला आहे.
हिंगोली शहरातील माणिक स्मारक आर्य विद्यालयात विद्यार्थ्यांनी प्रवेश दिंडी काढली. ही दिंडी महात्मा गांधी चौक, कपडा गल्ली, गाडीपुरा भागातून काढून विद्यालयात विसर्जीत करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. मुख्याध्यापिका सी. सी. महाजन, एस. जी. कोकाटे, आय. टी. घुगे, ए. एल. खरात, ए. आर. मारकड, एस. जी. जाधव, एम. पी. वसू, आर. ए. बोडखे, डी. एस. जगताप, जी.जी. जगताप, एस. एस. कंदी, जी. के. येवले, आर. एम. अग्रवाल उपस्थित होते.
वसमत तालुक्यातील आरळ येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
केंद्रप्रमुख रामराव वराड, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप राखोंडे, मुख्याध्यापक रंगनाथ पौळ, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य मुंजाजी साखरे, डिगांबर काळे, एस. पी. शिंदे, के. आर. गुंडाळे, व्ही. के. जामगे, लोहरेकर, भालेराव, सय्यद, शेख, गंगवाल उपस्थित होत्या
खंडाळा येथील जिल्हा परिषद शाळेत उपाध्यक्ष उद्धवराव गायकवाड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रवशोत्सव साजरा करण्यात आला.
या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन गायकवाड, उपसरपंच भाऊराव गायकवाड, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य किसनराव गायकवाड, मुख्याध्यापक आर. एन. डोळ, पी. के. सांगळे, ए. पी. काकुळते, एस. एल. दवंड, ए. पी. दराडे, एस. एस. पवार, पी. पी. ससाणे, जे. जी. भगत, के. एस. कोटगीरे, एम. ए. हनवते, सुरेश पाटील, सुनील मेथेकर, बी. वाय. मोरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Entrance to schools, distribution of books

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.